शिरूर येथे एन के साम्राज्यच्या नावाने दहशत माजवणारा टोळीचा म्होरक्या दिल्लीतून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 01:18 PM2021-05-11T13:18:16+5:302021-05-11T15:26:38+5:30

टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

Terrorist gang nabbed from Shirur in the name of NK Empire | शिरूर येथे एन के साम्राज्यच्या नावाने दहशत माजवणारा टोळीचा म्होरक्या दिल्लीतून जेरबंद

शिरूर येथे एन के साम्राज्यच्या नावाने दहशत माजवणारा टोळीचा म्होरक्या दिल्लीतून जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देएन के साम्राज्य टोळीवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे

शिरूर: नगरसेवक महेंद्र मल्लाव यांचा भर दिवसा शिरूर बाजार पेठेत एन के टोळीकडून खून करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात या टोळीची दहशत वाढत चालली होती. या टोळीचा म्होरक्या नानु उर्फ निलेश चंद्रकांत कुर्लप व त्यांचे सदस्य यांच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न व इतर गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील १३ जणांना मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले होते. मात्र नानु उर्फ निलेश कुर्लप हा फरारी होता.  त्याला दिल्ली येथून अटक करण्यात आल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

जानेवारीमध्ये प्रविण गोकुळ गव्हाणे यास एन. के. साम्राज्य टोळीतील सदस्यांनी कट रचला. शिरूर शहरातचं भररस्त्यात सायंकाळच्या वेळी गोळीबार करून व कोयत्याने वार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये एन.के.साम्राज्य टोळीचा म्होरक्या निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप हा गुन्हा केल्यापासून फरारी होता.  या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले होते. 
सदर गुन्हयाचा तपास करत असताना निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप हा दिल्ली येथे लपून बसला आहे.  अशी गोपनीय खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एन.के.साम्राज्य टोळीचा म्होरक्या निलेश उर्फ नानु कुर्लप यास दिल्ली येथून ताब्यात घेतले.  पुढील कार्यवाहीकरीता शिरूर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. गुन्हयाचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करत आहेत. 

Web Title: Terrorist gang nabbed from Shirur in the name of NK Empire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.