सारसबाग मंदिरात घुसले दहशतवादी
By Admin | Published: April 8, 2016 01:11 AM2016-04-08T01:11:25+5:302016-04-08T01:11:25+5:30
सारसबागेचा गजबजेला परिसर... तळ्यातल्या गणपतीचे दर्शन घेणारे भाविक... सकाळच्या त्या आल्हाददायक वातावरणात अचानक पोलीस घुसतात... काही कळायच्या आत बाग आणि मंदिर रिकामी करतात
पुणे : सारसबागेचा गजबजेला परिसर... तळ्यातल्या गणपतीचे दर्शन घेणारे भाविक... सकाळच्या त्या आल्हाददायक वातावरणात अचानक पोलीस घुसतात... काही कळायच्या आत बाग आणि मंदिर रिकामी करतात... मंदिरामध्ये दहशतवादी घुसलेत... त्यांनी एक खोली ताब्यात घेतलीय... शीघ्र कृती दलाचे जवान येतात... ‘आॅपरेशन प्लॅन’ ठरतो... अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या मदतीने जवान ‘स्ट्रॅटेजिकली’ मोहीम यशस्वी करतात... दहशतवाद्यांनी ठेवलेले बॉम्ब शोधण्यात पोलीस यशस्वी होतात... दोन दहशतवादी शस्त्रांसह सापडतात आणि सगळे सुटकेचा नि:श्वास सोडतात...
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिलेल्या सूचनांनुसार ‘मॉकड्रिल’ करण्यात आले. सकाळी साडेदहाच्या सुमारास सारसबाग मंदिरामध्ये दहशतवादी घुसल्याचा कॉल नियंत्रण कक्षाला देण्यात आला. त्यानंतर स्थानिक स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम, निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धावले. नियंत्रण कक्षातून माहिती मिळताच शीघ्र कृती दलाचे जवान सारसबागेजवळ दाखल झाले. परिमंडल २ चे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त मिलिंद मोहितेही या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. तसेच, सर्वच विभागांचे उपायुक्त, सहायक आयुक्त वॉकीटॉकी आणि चॅनलवरून पोलिसांना सूचना देत होते. सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद आणि अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे स्वत: या मोहिमेवर देखरेख ठेवून होते.
स्वारगेटकडून तसेच मित्र मंडळ चौकाकडून सारसबागेकडे येणारा
रस्ता पोलिसांनी बंद केला होता.
त्या रस्त्यांवरची वाहतूक वळवण्यात आली होती.