व्यापारी पेठेत दहशत करणाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:20 AM2021-03-13T04:20:35+5:302021-03-13T04:20:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंदेकर टोळीवर मोक्काची कारवाई केली. आता यानंतर नाना पेठ, गणेश पेठेतील व्यापारी पेठेत दहशत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आंदेकर टोळीवर मोक्काची कारवाई केली. आता यानंतर नाना पेठ, गणेश पेठेतील व्यापारी पेठेत दहशत करणाऱ्या गुंड सूरज ठोंबरेसह आठ जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. गेल्या दोन महिन्यांत शहरातील अकरा गुंड टोळ्यांविरोधात मोक्का कारवाई केली आहे.
शहरातील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ‘मोक्का’ कायद्याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत दहशत असलेल्या गुंड बंडू आंदेकर याच्यासह साथीदारांविरोधात पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. सूरज ठोंबरे, त्याचा साथीदार सोमनाथ गायकवाड पूर्वी आंदेकर टोळीत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे आंदेकर टोळीबरोबर वाद सुरू झाले होते. वर्चस्वाच्या वादातून त्यांनी नाना पेठ, गणेश पेठ भागात दहशत करून एकमेकांच्या साथीदारांवर हल्ले सुरू केले. दोन महिन्यांपूर्वी ठोंबरे टोळीतील गुंडांनी नाना पेठेत दहशत करून एकाच्या खुनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी कानिफनाथ विनोद महापुरे, ओंकार गजानन कुडले, राजन मंगेश काळभोर, शुभम दीपक पवळे, सूरज अशोक ठोंबरे, सोमनाथ सयाजी गायकवाड, नरसिंग भीमा माने यांच्याविरोधात मोक्का कारवाई केली. पवळे, सासवडे, माने, ठोंबरे आणि गायकवाड यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी ही कारवाई केली.