विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच केली टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:04+5:302021-05-06T04:12:04+5:30
शिरूरच्या ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करून नागरिकांना नियम पाळण्याचे ...
शिरूरच्या ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करून नागरिकांना नियम पाळण्याचे आव्हान शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पाबळ येथे झालेल्या बैठकीत केले होते. पाबळ येथे महिन्याभरात चार रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. त्यानंतर पाबळ ग्रामपंचायत व प्रशासन खडबडून जागे झाले असून, या भागात नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
बुधवारी बाजारस्थळ, एस. टी. स्टँड परिसर, बाजारपेठ, लोणी चौक आदी भागात धडक कारवाई करत बेशिस्त दुकानदारांना त्याचबरोबर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाई करत कार्यवाही करण्यात आली. त्याचबरोबर कोरोना रुग्ण असलेल्या घरांवर स्टिकर लावत होम क्वारंटाइन असलेल्या रुग्णांना बाहेर न पडण्याचे आव्हान सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी केले.