मानसिक कणखरता अन् सकारात्मकतेची कसोटी : डॉ. साैरभ सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:39+5:302021-04-01T04:10:39+5:30

इन्ट्रो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मानसिक कणखरता आणि सकारात्मक विचार अत्यंत मोलाचे आहेत. या दोन बाबींचा जोडीला सातत्याने ...

Test of mental toughness and positivity: Dr. Sairabh Sonawane | मानसिक कणखरता अन् सकारात्मकतेची कसोटी : डॉ. साैरभ सोनवणे

मानसिक कणखरता अन् सकारात्मकतेची कसोटी : डॉ. साैरभ सोनवणे

Next

इन्ट्रो

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मानसिक कणखरता आणि सकारात्मक विचार अत्यंत मोलाचे आहेत. या दोन बाबींचा जोडीला सातत्याने परीक्षेचा सराव केल्यास यूपीएससीत हमखास यश मिळते. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील डाॅ. सौरभ सोनवणे यांनी पहिल्या प्रयत्नात केवळ ८ गुणांनी हुकलेली संधी दुसऱ्याच प्रयत्नात जिद्दीने आयएएस पद मिळवले. मसुरी येथील दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर सध्या ते मध्य प्रदेश राज्यातील टिकमगढ जिल्ह्यातील जठाराचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. सौरभ सोनवणे यांनी मुंबईतील मेडिकल कॉलेज येथून २०१४ साली वैद्यकीय पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना प्रथम प्रयत्नात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या परीक्षेत असिस्टंट कमांडन्ट पद मिळाले. यूपीएससी २०१५ च्या प्रथम प्रयत्नात ते पूर्व, मुख्य परीक्षा पास करत मुलाखतीपर्यंत गेले होते. मात्र, केवळ ८ गुणांनी तेव्हा त्यांना पद मिळाले नव्हते. मात्र, वैद्यकीय अधिकारी असलेले वडील आणि आईने त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लासला न जाता स्वत: अभ्यास करून दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवले आहे.

* पूर्वपरीक्षेची तयारी :

पूर्वपरीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी आणि आकडेवारी (स्टॅटिक पार्ट), संदर्भ ग्रंथाच्या साहाय्याने सराव करणे, जास्तीत जास्त वैकल्पिक प्रश्न सोडवणे, त्याचबरोबर परीक्षेच्या आधी किमान महिनाभर नियमितपणे सराव परीक्षा देणे, मुख्यत: सी-सॅट पेपरचा जास्तीत जास्त सराव हा अंतिम परीक्षेला फायदेशीर ठरू शकतो. यासाठी मागील पाच वर्षातील पेपर तपासून त्याची तुलनात्मक उजळणी करणे गरजेचे आहे.

* मुख्य परीक्षेची तयारी :

मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयांच्या पेपरची तयारी करताना तुमचे त्या-त्या विषयातील आकलन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नियमितपणे वर्तमानपत्र वाचन करणे, त्यातील महत्त्वाचे पाॅइंट नोट करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्य परीक्षेत तुमच्या लिखाणाचा कस लागतो. त्यामुळे जास्तीत पेपर वेळ लावून सोडवण्याचा सराव करणे गरजेचे आहे. सामान्य अध्ययनचे एकूण ४ पेपरचे १००० गुण आणि वैकल्पिक विषयाच्या दोन पेपरचे ५०० गुण तसेच २०० गुणांचा एक निबंध हे केवळ सातत्याने पेपर सोडवण्याचा प्रयत्न केल्यास अंतिम परीक्षेवेळी पूर्ण करता येतात. यासाठी मागील सोडवलेल्या पेपरमधून किती गुण मिळाले आणि कोणत्या बाबी सोडवता आल्या नाहीत. त्या शिक्षकांकडून समजावूत घेत स्वत: उजळणी केल्यास पुढच्या पेपरला त्या फायदेशीर ठरतात.

* वेगवेगळे अहवाल/राजकीय घटनांची नोंद ठेवणे

राज्य तसेच देशपातळीवर वर्तमान पत्र, नियतकालिकातून प्रसिद्ध होणारे शासनाचे अहवाल, राज्यघटनेतील बदल, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींची नोंद ठेवणे हे पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोन्हींसाठी अत्यंत मोलाचे आहेत. यासाठी मायक्रो नोट्स काढून ठेवल्यास परीक्षेपूर्वी उजळणी करण्यासाठी तुम्हाला त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

(फोटो : सौरभ सोनवणे डाॅ. आयएएस

या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)

Web Title: Test of mental toughness and positivity: Dr. Sairabh Sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.