कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवारांची साक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:45+5:302021-07-10T04:09:45+5:30
याबाबत शरद पवार यांना लवकरच बोलावले जाणार असल्याची माहिती चौकशी आयोगाचे वकील ॲड. आशिष सातपुते यांनी दिली. पुण्यातील जुन्या ...
याबाबत शरद पवार यांना लवकरच बोलावले जाणार असल्याची माहिती चौकशी आयोगाचे वकील ॲड. आशिष सातपुते यांनी दिली. पुण्यातील जुन्या जिल्हा परिषद (हवेली पंचायत समिती कार्यालय) येथे येत्या २ ऑगस्टपासून सुनावणी सुरू होणार आहे.
सन २०१८ मध्ये एक जानेवारीला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडला होता. या प्रकरणी शरद पवार यांनी चौकशी करण्याची मागणी केली होती. या घटनेबद्दल त्यांनी काही माहिती दिली होती. ही दंगल घडली तेव्हा राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार सत्तेत होते. या हिंसाचारामागे हिंदुत्ववादी शक्तींचा हात असल्याचा आरोप तेव्हा काॅँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस या पक्षांनी केला होता. त्यामुळे त्यांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे झाली होती. पुणे पोलिसांनी नऊ कार्यकर्त्यांना अटक केली होती. पुढे सत्ताबदल होऊन राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याची मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या पार्श्वभूमीवर पवारांचा जबाब महत्त्वाचा मानला जात आहे.