आत्मविश्वासाने जा परीक्षेला

By admin | Published: February 19, 2016 01:16 AM2016-02-19T01:16:42+5:302016-02-19T01:16:42+5:30

सलग दोन दिवसांत हृषीकेश तापकीर व प्रतीक पाटील या महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत वातारवण

Testing to be confident | आत्मविश्वासाने जा परीक्षेला

आत्मविश्वासाने जा परीक्षेला

Next

पिंपरी : सलग दोन दिवसांत हृषीकेश तापकीर व प्रतीक पाटील या महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत वातारवण चिंतातुर झाले आहे. यामुळे पालकांचीही धास्ती वाढली आहे. नैराश्यातून विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. अभ्यासाचा ताण न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेला निर्भयपणे सामोरे जाणे गरजेचे आहे.
बारावीची परीक्षा तोंडावर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मुलांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याइतपत काय घडले? या आत्महत्येमागील नेमके कारण समजून घेऊन परीक्षेच्या कालावधीत वातावरण आनंदी कसे राहील, याची काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थी वसतिगृहावर राहतात. यामुळे घरच्यांशी फार कमी संवाद होते. आपल्या मुलाला शिकण्यासाठी बाहेर ठेवले आहे, पालकांना ही अभिमानाची बाब वाटते. घरच्यांशी संभाषण झाले तरीही ते कमी प्रमाणात, तसेच अभ्यासाबद्दल होते. त्यातच वसतिगृहाची फी तसेच दैनंदिन खाण्याचा खर्च दिलेल्या पैशात होत नाही. शिक्षणासाठी परगावी राहिल्यानंतर पैशांचीही चणचण भासते. बाहेरगावावरून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यामुळे महाविद्यालयांनीही तितके सतर्क राहणे गरजेचे आहे. पाल्यावर असलेल्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे परीक्षेत मुलाला कमी गुण मिळाले अथवा परीक्षेत नापास झाला, तर त्या पाल्याला घरच्यांची जास्त भीती वाटते, त्यातूनच ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात.
बारावीत शिकणारा हृषिकेश तापकीर याने घरातील अभ्यासखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. १७ फेब्रुवारीला ही घटना घडली. मात्र, परीक्षेच्या कालावधीत आत्महत्या झाल्याने परीक्षेच्या तणावामुळेच आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अजिंक्य डी. वाय पाटील कॉलेजमध्ये २० वर्षे वयाच्या प्रतीक पाटीलने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. सत्र परीक्षेत सहापैकी पाच विषयांत तो नापास झाला होता.
विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा येणारा अतिरिक्त ताण, तसेच अभ्यासामुळे येणारा एकलकोंडेपणा
आत्महत्येला कारणीभूत ठरत आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे प्रेमसंबंध, करिअरमधून नैराश्यामुळे असे प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Testing to be confident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.