चाचण्या वाढल्या, काेरोना रुग्ण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:50+5:302021-01-13T04:23:50+5:30

पुणे : शहरात मागील आठवडाभरात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ झाली असली, तरी बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे आठवडाभरातील ...

Tests increased, Carona patients decreased | चाचण्या वाढल्या, काेरोना रुग्ण कमी

चाचण्या वाढल्या, काेरोना रुग्ण कमी

Next

पुणे : शहरात मागील आठवडाभरात कोरोना चाचण्यांमध्ये वाढ झाली असली, तरी बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे आठवडाभरातील पॉझिटिव्हिटी रेट पहिल्यांदाच सहा टक्क्यांच्या खाली आला आहे. या आठवड्यात जवळपास २५ हजार ८०० चाचण्या झाल्या. ही बाब पुणेकरांसाठी दिलासादायक ठरली आहे.

मागील आठवड्यात शहरातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, त्यासाठी शिक्षकांना कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे या आठवड्यात बहुतेक शिक्षकांच्या चाचण्या झाल्याने एकूण चाचण्यांची संख्या वाढली. त्यातुलनेत बाधित रुग्णांचा आकडा मात्र वाढला नाही. परिणामी, आठवडाभरातील पॉझिटिव्हिटी रेट पहिल्यांदाच ७ टक्क्यांच्या खाली आला. या आठवड्यात २५ हजार ७९१ चाचण्या झाल्या. तर, १ हजार ६४९ नवीन रुग्ण आढळले. त्या तुलनेत १ हजार ८८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत २५ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, शहरातील एकूण पॉझिटिव्हिटी रेट १९ टक्क्यांच्या खाली आला आहे. शनिवारी (दि. ९) हा दर १८.९७ टक्के एवढा होता. मृत्यूदर मात्र स्थिर असून अजूनही अडीच टक्क्यांच्या पुढेच आहे. दर आठवड्याला त्यामध्ये किंचितशी घट होताना दिसते.

------------

मागील काही आठवड्यातील स्थिती

कालावधी चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट मृत्यू दर

दि. ३ ते ९ जाने. २५,७९१ १६४९ ६.३९ १.५१

२७ डिसें. ते २ जाने. २०,४९० १४३६ ७ १.८८

२० ते २६ डिसें. १६,८६२ १५१५ ८.९८ १.७८

१३ ते १९ डिसें. १७,७५५ १७३० ९.७४ १.९६

६ ते १२ डिसें. १९,४०४ १६४१ ८.४५ २.६२

२९ नोव्हें. ते ५ डिसें. २०,३१४ १९७५ ९.७१ १.२६

----------------------------------------

कोरोनाची साथ ओसरली का ?

सध्या गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची साथ ओसरल्याची चर्चा आहे. तसेच ठिकठिकाणी गर्दी होत असली, तरी पूर्वीसारखे नवीन रुग्ण आढळून येत नाहीत. याचाच परिणाम कोरोनाचा परिणाम कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Tests increased, Carona patients decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.