पुण्यातील चाचण्या दहा लाखांच्या पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:13+5:302021-01-25T04:10:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आजवर पालिकेने केलेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा दहा लाखांच्या पार गेला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आजवर पालिकेने केलेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा दहा लाखांच्या पार गेला. एकूण बधितांची संख्या पाहता हे प्रमाण साडेअठरा टक्के आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर आणि लवकर चाचण्या झाल्यामुळे संभाव्य रुग्ण शोधून वेळीच उपचार केल्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात २२८ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या २५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ७५ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २९६ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. तर, पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ७३५ झाली आहे.
दिवसभरात एकूण २५८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७७ हजार ६६४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ८४ हजार ४७४ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ७५ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ७४२ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १० लाख १३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे