TET Exam Scam: तुकाराम सुपेसहित ५ आरोपींना कोरोनाची लागण; सायबर पोलीसचे ११ अधिकारीही बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 04:32 PM2022-01-07T16:32:57+5:302022-01-07T16:33:59+5:30
सायबरच्या पोलीस उपायुक्तांसह 11 अधिकारी-कर्मचा-यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे
पुणे : टीईटी आणि शिक्षक पात्रता भरती परीक्षा घोटाळ्यातील अटकेत असलेल्या तुकाराम सुपे, शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिंघोट या सहा आरोपींना कोरोनाची लागण झाली असून, सायबरच्या पोलीस उपायुक्तांसह 11 अधिकारी-कर्मचा-यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. सध्या काही आरोपींना कारागृहात विलीगीकरणात तर काहींना ससून रूग्णालयात ठेवण्यात आले आहे.
पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. आरोपींनाही कोरोनाची लागण होण्यास सुरूवात झाली असून, त्यांच्या संपर्कात येणा-या पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनाही कोरोना झाला आहे. पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह 11 अधिकारी कर्मचारी कोरोनाग्रस्त आहेत. आरोपींच्या संपर्कात राहून तपास करणे आरोग्यास अन्यायकारक आहे. त्यामुळे आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिंघोट यांचे पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून तूर्तास तरी त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर होण्याची विनंती सायबर पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.