लग्न सोहळे रद्द झाल्याने ग्रामीण भागातील कापड व रेडिमेड कपडे व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:08 AM2021-06-21T04:08:01+5:302021-06-21T04:08:01+5:30

बेरोजगारीमुळे अनेकांनी मिळेल त्या बँकेचे कर्ज घेऊन व्यवसायात करिअर करण्याच्या उद्देशाने कापड, रेडिमेड दुकाने थाटली आहेत. मात्र, अनेक तरुणांनी ...

Textiles and readymade garments in rural areas are in trouble due to cancellation of wedding ceremonies | लग्न सोहळे रद्द झाल्याने ग्रामीण भागातील कापड व रेडिमेड कपडे व्यावसायिक अडचणीत

लग्न सोहळे रद्द झाल्याने ग्रामीण भागातील कापड व रेडिमेड कपडे व्यावसायिक अडचणीत

Next

बेरोजगारीमुळे अनेकांनी मिळेल त्या बँकेचे कर्ज घेऊन व्यवसायात करिअर करण्याच्या उद्देशाने कापड, रेडिमेड दुकाने थाटली आहेत. मात्र,

अनेक तरुणांनी नोकरी मिळविण्यासाठी खेटे मारून पदरी निराशा पडल्यानंतर निरनिराळ्या व्यवसायाला जवळ केले आहे. काही तरुणांनी कापड व रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय निवडला आहे.

मुख्य बाजारपेठेत दुकान घेण्यासाठी त्यांना पाच ते दहा

लाखांपर्यंतची जागा, मिळेल त्या बँकेचे कर्ज, भाड्याने घेतले तर दहा ते वीस हजार पर्यंत भाडे,फर्निचर, नोकर आदींची मोट बांधताना लाखोंचा खर्च आला आहे. या व्यवसायाचे सर्वात मोठे सिझन म्हणजे लग्नसराई. या सिझनमध्ये उभारी देऊन जाते.

परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन्ही लग्नसराईचा सिझन लॉकडाऊन असल्याने मोकळा गेल्याने कापड व्यावसायिक हतबल झाले आहेत.

दुकानाला कुलूप

ऐन लग्नसराईत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने व्यवसायाला गती येण्याआधीच दुकानाला लॉक लागले. परिणामी नफा कमवून आर्थिक गाडी रुळावर आणणे सोडा; हजारो रुपयांचे दुकान भाडे, लाईटबिल व लाखो रुपयांच्या कर्जाचे व्याज या व्यावसायिकांवर बसले आहे.

पुणे शहरातील सर्व व्यवसाय सुरू, ग्रामीणमधील बंद

प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या

उपाययोजनांमुळे कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे. दरम्यान, पुणे शहरात सर्व दुकाने उघडल्याने नागरिकांना

सुविधा उपलब्ध झालेली आहे. पण ग्रामीण भागात अजूनही व्यवसायांना परवानगी नसल्याने नियम घालून परवानगी देण्यात यावी अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे आहे.

लाखोंची गुंतवणूक करून कापड विक्रीचे दालन सुरू केले.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांपासून व्यवसायात काहीच उत्पन्न नसून दालनाचे भाडे व लाईट बिल खिशातूनच भरावे लागत आहे.जिल्हा प्रशासनाने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर,कदमवाकवस्ती अशा मोठ्या गावातील व्यावसायिकांना नियमावली देऊन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी.

करण गायकवाड(व्यावसायिक)

Web Title: Textiles and readymade garments in rural areas are in trouble due to cancellation of wedding ceremonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.