Sanjay Raut: महाराष्ट्रातील विरोधकांसाठी आपलं 'ठोकरे' सरकार; १०५ आमदार असणाऱ्यांनी सांभाळून राहावं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 08:17 PM2021-09-26T20:17:24+5:302021-09-26T21:17:37+5:30

राऊत यांनी शिवसैनिकांची फळी मजबूत करण्याबरोबरच शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अशा विविध विषयांवर भाष्य केले

thakare government for opposition in Maharashtra; Those with 105 MLAs should take care | Sanjay Raut: महाराष्ट्रातील विरोधकांसाठी आपलं 'ठोकरे' सरकार; १०५ आमदार असणाऱ्यांनी सांभाळून राहावं

Sanjay Raut: महाराष्ट्रातील विरोधकांसाठी आपलं 'ठोकरे' सरकार; १०५ आमदार असणाऱ्यांनी सांभाळून राहावं

Next
ठळक मुद्देपुणे महापालिकेवर भगवा फडकवण्याची वेळ आली आहे

पुणे : महानगरपालिका निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पक्षांचे राजकीय नेते महाराष्ट्रातील जिल्हयातून कार्यकर्त्यांच्या भेटीबरोबरच महापालिकांचा आढावा घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी शिवसैनिकांची फळी मजबूत करण्याबरोबरच शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अशा विविध विषयांवर भाष्य केले. तर विरोधकांवर टोलेबाजी करत टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेची काय ताकद आहे या विषयावर बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना हा रेसचा घोडा आहे. घोडे लावायचे त्यांना लावले आहेत. घोडे लावण्यात मी माहीर आहे. ते मला सांगव लागत नाही. हे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आहे. पण अशा लोकांसाठी ठोकरे सरकार आहे. ठोकून काढणं आपलं काम आहे. त्यामुळं १०५ आमदार असणाऱ्यांनी सांभाळून राहावं अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.'' 

शिवसेना आग आहे, वाट्याला जाऊ नका 

''राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. सर्वांनी त्यांच्याकडं त्याच आदरानं पाहावं अशी त्यांचीही नक्कीच अपेक्षा असेल. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यास अटक झाली ना. अशी टीकाही त्यांनी नारायण राणेंवर केली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना आग असल्याचा इशारा राऊत यांनी यावेळी दिलाय. शिवसेना महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे. ते सर्वांना घेऊन काम करत आहेत. असंही ते म्हणाले आहेत.''
 
मी पुन्हा येईन वाक्यावर राऊतांच्या खोचक टोला 

''पुणेकरांचा उत्साह खूप असतो. त्यांना काही सांगावं लागत नाही. आता पुणे महापालिकेत १० नगरसेवक आहेत. पण यावेळी हीच संख्या वाढायला हवी. असं म्हणत पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्याची वेळ आली आहे. अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शाखा ही शिवसेनेची ताकद आहे. लहान लहान कार्यकर्त्याशी बोलत राहील पाहिजे. पुण्यातील वातावरण चांगलं आहे. 'मी पुन्हा येईन' म्हणत त्या अर्थाने नाही पक्षाच्या कामाने म्हणत फडणवीसांच्या वाक्यावर राऊत यांनी खोचक टोला लागलेला आहे.'' 

''पुणे, पिंपरी - चिंचवड महापालिकांमध्ये भगवा फडकत नाही, याची खंत वाटते. शिवसेनेचे खासदार - आमदार निवडून येतात, पण महापालिका निवडणुकीत फुगा फुटतो. मागील निवडणुकीत चारच्या पॅनेल होते म्हणून पराभव झाला असे म्हणणे योग्य नाही. आपला पाया ढेपाळला होता, संघटनात्मक बांधणी कमकुवत होती, हे मान्य करायला हवे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका यंदा होता कामा नये. महाविकास आघाडी होईल का नाही, झाली तर काय, नाही झाली तर काय, या भानगडीत पडू नका. निवडणुका एकट्याच्या जीवावर लढायची सवय आपल्याला आहे. सगळया जागांवर स्वबळावर लढायची आपली तयारी आहे. मात्र, स्वाभिमान सोडून, भगव्या झेंड्याशी तडजोड करुन आघाडी होणार नाही. आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय, असे शिवसेनेचे धोरण असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे.'' 

Web Title: thakare government for opposition in Maharashtra; Those with 105 MLAs should take care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.