बारामती एसटी बसस्थानकात विद्यार्थ्यांचे थाळीनाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 02:21 AM2018-12-16T02:21:31+5:302018-12-16T02:21:57+5:30
आगार प्रमुखांच्या विरोधात घोषणाबाजी : बस नसल्याने विद्यार्थी संतप्त
सांगवी : बससेवा सुरू होत नसल्याने बारामतीच्या बसस्थानकात संतप्त विद्यार्थ्यांनी परिवहन मंत्री, व आगारप्रमुखांच्या विरोधात घोषणाबाजी करीत थाळीनाद आंदोलन केले. दिवाकर रावते, ‘तुम एक काम करो, खुर्ची छोडो, आराम करो,’ ‘एसटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,’ ‘भारत माता की जय,’ वंदे मातरम्च्या घोषणा देत आंदोलन केले.
एसटी नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे महाविद्यालय प्राचार्य यांच्या कडून बोलणी खावी लागत आहेत, तर बारामतीच्या बसस्थानकातील चौकशी कक्षात माहिती विचारण्यासाठी गेल्यास तेथील कर्मचारीदेखील व्यवस्थित माहिती देत नाहीत. तर जेजुरीमार्गे येणाऱ्या एसटीबस येताना भरगच्च प्रवाशांसह येतात. यामुळे कºहावागज येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची. मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कºहावागजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्या कारणाने बारामतीच्या आगारप्रमुखांना
१६० विद्यार्थ्यांसह निवेदन देण्यात आले होते.
जेवढे शक्य आहे तेवढे करून विभागीय कार्यालयाला कळवून विद्यार्थ्यांची गैरसोय रोखण्यासाठी कºहावागज ते बारामती बससेवा तातडीने सुरू करण्यात येईल.
-अमोल गोंजारी,
आगारप्रमुख, बारामती बसस्थानक
बस स्थानकात आगार प्रमुखांना मज्जाव
दिवाळीनंतर बससेवा सुरू करण्यात येईल असे आश्वासन आगारप्रमुखांनी दिले होते. मात्र, या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून टोलवाटोलवी केली जात आहे. यामुळे आजतागायत दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने, आगारप्रमुख गेंड्याची कातडी पांघरल्यासारखे झोपले आहेत. कानात सुपारीचा खडा घालून बसले आहेत. यामुळे बहिºयांना ऐकू येण्यासाठी आम्ही थाळीनाद आंदोलन करत असल्याचे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर एसटी चालू न केल्यास आगारप्रमुखांना बसस्थानकात येऊ देणार नसल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला आहे.