इंदापूर तालुक्यात लाळखुरकत रोगाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:44+5:302021-09-17T04:14:44+5:30
बहुतांश आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने पशुधन अडचणीत बहुतांश आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने पशुधन अडचणीत बारामती : इंदापूर ...
बहुतांश आरोग्य केंद्रात
लस उपलब्ध नसल्याने पशुधन अडचणीत
बहुतांश आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने पशुधन अडचणीत
बारामती : इंदापूर तालुक्यातील जनावरांमध्ये गेल्या महिनाभरापासून ‘लाळखुरकत’ या रोगाने थैमान घातले आहे. या रोगाची लागण झालेली बहुतांश जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
याबाबत लासुर्णे (ता. इंदापूर) येथील भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना, पशुधनविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. येथील कार्यालयीन अधीक्षक अशोक फलफले यांनी हे पत्र स्वीकारले. यामध्ये वाकसे यांनी शेतकऱ्यांना दुर्दैवाने त्यांना यात प्रचंड अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याचे नमूद केले आहे.
या परिस्थितीमध्ये या अडचणी आणखी वाढल्या आहेत. वास्तविक परिस्थितीमध्ये या साथीच्या रोगासाठी प्रशासन सज्ज असायला हवे होते. परंतु, बहुतांश आरोग्य केंद्रात याची लसच उपलब्ध नाही. गावोगावी जाऊन लसीकरण केलेले नाही ही बाब गंभीर आहे. पुणे जिल्ह्याच्या काही भागात लंगी या आजाराने डोके वर काढले आहे. या भयंकर परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा आरोग्य विभाग यांनी तत्परता दाखवत उपाययोजना करावी, अशी मागणी वाकसे यांनी केली आहे. याबाबत पंचायत समिती प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी केला आहे.
—————————————————
फोटो ओळी : जनावरांना लाळखुरकतबाबत उपाययोजना करावी या मागणीचे निवेदन पशुधन विकास अधिकाऱ्यांना देताना गजानन वाकसे.
१६०९२०२१-बारामती-०५
————————————————