वडगावशेरी अल्पसंख्याक विभागाने मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:17+5:302021-01-02T04:10:17+5:30
-- लेफ्टनंटपदी २२ वर्षीय पाठक यांची निवड पुणे : भारतीय सेनादलात लेफ्टनंट पदी ऋषीकेश अतुल पाठक या २२ वर्षीय ...
--
लेफ्टनंटपदी २२ वर्षीय पाठक यांची निवड
पुणे : भारतीय सेनादलात लेफ्टनंट पदी ऋषीकेश अतुल पाठक या २२ वर्षीय तरुणाची निवड झाली आहे.
ऋषीकेश यास दि. ७ रोजी चेन्नईतील ऑफीसर्स ट्रेनिंग अकॅडमी मध्ये रुजू होण्याचे आदेश मिळाले आहेत. यू.पी. एस. सी ने जाहीर केलेल्या यादीत १४७ व्या क्रमांकावर त्याची निवड झाली आहे. सी.डी.एस. लेखी परीक्षा तसेच एस. एस. बी. मुलाखतीसाठी अपेक्स करीअर्सचे निवृत्त लेफ्टनंट प्रदीप ब्राह्मणकर यांचे मार्गदर्शन मिळाले. ऋषीकेश बॅडमिंटन खेळाडू आहे. आईवडिलांना एकुलता एक मुलगा आहे. त्याचे वडील अतुल पाठक हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्याची आई मनीषा पाठक यांचा व्यवसाय आहे. एक वर्षाचे सैनिकी यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याला सेना दलात लेफ्टनंट पदी रुजू होईल.
--
गोवा या दिनदर्शिकेचे प्रकाशन
पुणे : गोवा या चित्रमालिकेवर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका वीणा देव, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि विक्रमसिंह बाजी मोहिते यांच्या हस्ते केले.
चित्रकार भास्कर सागर यांनी या दिनदर्शिकेत गोव्यास दिलेल्या भेटीत त्या त्या ठिकाणी जाऊन काढलेल्या चित्रांचा यामध्ये समावेश असून पर्यटकांचा स्वर्ग-नयनरम्य गोवा हा विषय चित्रित केला आहे.
--
पोस्टर स्पर्धेत विशाल माळी प्रथम
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिके तर्फे माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत पोस्टर बनविण्यासाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
विशाल हा वालूबेन मावजी पटेल इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत इयत्ता ६ वीच्या वर्गात शिकत आहे. त्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.