टेस्ट ट्युब बेबीने मानले डॉक्टरांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 09:06 PM2018-10-06T21:06:25+5:302018-10-06T21:10:37+5:30

डॉ.सुभाष मुखर्जी यांनी टेस्ट ट्यूब बेबीच्या निर्मितीसाठी खूप संशोधन केले. त्यांच्या या मोलाच्या योगदानामुळे मी तुमच्यासमोर उभी आहे....

thanks to doctors by the test tube baby | टेस्ट ट्युब बेबीने मानले डॉक्टरांचे आभार

टेस्ट ट्युब बेबीने मानले डॉक्टरांचे आभार

googlenewsNext
ठळक मुद्देकनुप्रिया अगरवाल : जगातील दुसरा प्रयोग भारतातडॉक्टर व शास्त्रज्ञांचा आदर करा व सृजनांचे स्वागत करा, असे आवाहनटेस्ट ट्यूब बेबी हे डॉक्टरांची स्वत:ची पध्दत असल्याने ती यशस्वी

पुणे : सृजनाचे नेहमी स्वागत करायला हवे. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ समाजासाठी मनापासून संशोधन करत असतात आपण त्यांच्या या संशोधनाचा स्वीकार करायला पाहिजे. त्यांचा आदर करावा. डॉ.सुभाष मुखर्जी यांनी टेस्ट ट्यूब बेबीच्या निर्मितीसाठी खूप संशोधन केले. त्यांच्या या मोलाच्या योगदानामुळे मी तुमच्यासमोर उभी आहे, अशी भावना भारतातील पहिली आणि जगातील दुसरी टेस्ट ट्यूब बेबी कनुप्रिया अगरवाल यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली.
डॉ. खुर्द एन्डोस्कोपिक सर्जरी, फर्टिलिटी व आयव्हीएफ सेंटर आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट यांच्या वतीने अगरवाल यांचा ४० व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक, टेस्ट ट्युब बेबीचे जनक डॉ. सुभाष मुखर्जी यांचे एम्ब्रियोलॉजिस्ट सुनीत कुमार मुखर्जी, लायन्स क्लबचे डॉ संजीव खुर्द, डॉ. भारती ढोले पाटील, डॉ. ज्योती तोष्णीवाल आदी उपस्थित होते. 
अगरवाल म्हणाल्या, डॉ मुखर्जी यांनी केलेले संशोधन आणि स्वीकारलेल्या आव्हानामुळे मी हे जग पाहू शकते. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांना सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शूर होण्याचा प्रयत्न करा. कुठलेही काम करताना चूक झाल्यावर माफी मागा, डॉक्टर व शास्त्रज्ञांचा आदर करा व सृजनांचे स्वागत करा, असे आवाहनही त्यांनी केले. 
भारतीयांची बुद्धिमत्ता परदेशातील बुद्धिमत्तेच्या तोडीची आहे. हे कनुप्रियाच्या जन्माने दाखवून दिले. असे डॉक्टर सातत्याने विविध विषयात संशोधन करत असतात. त्यांना आपण सर्वांनी प्रोत्साहन द्यायला हवे, अपेक्षा टिळक यांनी व्यक्त केली. सुभाष मुखर्जी हे मोठे संशोधक होते. त्यांचे योगदान फारच महत्वाचे आहे. त्यांनी फ्रोजन एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्निक ही प्रक्रिया शोधून काढली. टेस्ट ट्यूब बेबी हे डॉक्टरांची स्वत:ची पध्दत असल्याने ती यशस्वी ठरली. राष्ट्राला भूतकाळ नसेल तर ते भविष्यकाळ निर्माण करू शकत नाही. सुभाष मुखर्जी यांच्या प्रयोगातून भविष्य निर्माण होऊ शकते, अशे सुनीत कुमार मुखर्जी यांनी नमुद केले. 
---------------------

Web Title: thanks to doctors by the test tube baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.