'ती' पार्टी ठरली अखेरची! वादातून मित्रालाच संपवले, हडपसर परिसरातील घटना
By भाग्यश्री गिलडा | Updated: May 27, 2024 15:33 IST2024-05-27T15:32:18+5:302024-05-27T15:33:11+5:30
हा प्रकार २५ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे....

'ती' पार्टी ठरली अखेरची! वादातून मित्रालाच संपवले, हडपसर परिसरातील घटना
पुणे : एक महिनापूर्वी दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून दारू पित असतांना एकाचा खून केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी राहुल दत्तात्रेय घुले (वय- ४१, रा. हडपसर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत मयताचे वडील भास्कर तुकाराम आडसुळ (वय- ६४, रा. मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
फिर्यादी यांचा मुलगा संतोष भास्कर आडसुळ आणि त्याचा मित्र राहुल घुले हे दोघे मांजरी येथील बांधकाम सुरु असलेलय एका खोलीमध्ये एकत्र दारू पित बसले होते. दारू पितांना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचा राग मनात धरून राहुल घुले याने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक मोढवे करत आहेत.