पुण्यातील संतापजनक प्रकार! कॅफे चालवणाऱ्या महिलेला किचनमध्ये बोलावून केलं असं काही की...,
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 18:28 IST2022-03-31T18:28:33+5:302022-03-31T18:28:48+5:30
कॉफी शॉप चालवणाऱ्या महिलेला महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगून किचनमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर

पुण्यातील संतापजनक प्रकार! कॅफे चालवणाऱ्या महिलेला किचनमध्ये बोलावून केलं असं काही की...,
धायरी : कॉफी शॉप चालवणाऱ्या महिलेला महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगून किचनमध्ये बोलावून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२० मध्ये सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे घडला आहे. याबाबत शिवणे येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महेश मुरलीधर शिंदे (रा. सहकारनगर, पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आरोपी शिंदे याच्या वडगाव बुद्रुक येथील दुकानात कॉफी शॉप आहे. आरोपीने पीडित महिलेला महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगून किचनमध्ये बोलावून घेतले. त्याठिकाणी महिलेसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केला. तसेच पीडित महिला चालवत असलेले शॉप खाली करावे यासाठी अश्लील शिवीगाळ केली. आरोपीने पीडित महिलेला दुकान खाली करायचे नसेल तर शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. महिलेचे पती आजारी असल्याने त्यांनी मंगळवारी (दि. २९ मार्च) सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे करीत आहेत.