सुरक्षा मंत्रालयात 'माया'चे आगमन! सायबर आणि मालवेअर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
By भाग्यश्री गिलडा | Updated: August 11, 2023 16:53 IST2023-08-11T16:49:59+5:302023-08-11T16:53:05+5:30
सर्व संगणकांमधील मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टम बदलून "माया" ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्याचा निर्णय घेतला आहे...

सुरक्षा मंत्रालयात 'माया'चे आगमन! सायबर आणि मालवेअर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पुणे : देशाचे संरक्षण आणि गंभीर पायाभूत सुविधांवर वाढत्या सायबर आणि मालवेअर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मंत्रालयाने सर्व संगणकांमधील मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टम बदलून "माया" ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या, माया फक्त सुरक्षा मंत्रालयाच्या प्रणालींमध्ये स्थापित केली जात आहे. यामध्ये विंडोज सारखी सर्व कार्यक्षमता आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यात फारसा फरक जाणवणार नाही. सुरूवातीला १५ ऑगस्टपूर्वी साऊथ ब्लॉकमधील सर्व संगणकांवर माया इंटरफेस स्थापित करणार आहे. याशिवाय या प्रणालींमध्ये 'चक्रव्यूह' नावाची ‘एंड पॉइंट डिटेक्शन अँड प्रोटेक्शन सिस्टिम’ देखील बसवली जात आहे. सरकारी विकास संस्थांनी केवळ सहा महिन्यांत 'माया' ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली आहे. माया मालवेअर हल्ले आणि इतर सायबर हल्ल्यांना प्रतिबंध करेल असे सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.