पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे; चंद्रकांत पाटलांचे मत

By भाग्यश्री गिलडा | Published: June 5, 2023 03:36 PM2023-06-05T15:36:42+5:302023-06-05T15:37:11+5:30

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ५८ नागरिकांना सुमारे ५ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला

The attitude towards the police should change Opinion of Chandrakant Patal | पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे; चंद्रकांत पाटलांचे मत

पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे; चंद्रकांत पाटलांचे मत

googlenewsNext

पुणे: पुणे शहर पोलीस मुख्यालय मैदान येथे पुणे शहर पोलीस दलातर्फे मुद्देमाल हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ५८ नागरिकांना सुमारे ५ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला. 

मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम अभिनव असून त्याद्वारे मुद्देमाल मिळालेल्यांना समाधान मिळते आणि जनतेत पोलिसांविषयी चांगला संदेश जातो, विश्वासाची भावना निर्माण होते. त्यासोबत चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही मिळते. पोलीस प्रत्येक गुन्ह्यांचा तपास गांभीर्याने आणि परिश्रमपूर्वक करतात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांसोबत असणे, त्यांना सहकार्य करणे आणि प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. 

अलीकडच्या काळात गुन्हेगार अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्या तुलनेत पोलीस अत्यंत मर्यादित साधनांसह आपले काम चांगल्याप्रकारे करतात. पोलिसांना अद्ययावत शास्त्र, साधने उपलब्ध करून देण्यासाठी आणि पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पालकमंत्र्यांनी स्वतः भेटवस्तू देऊन या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, गुन्हे उघडकीस आल्यावर मुद्देमाल हस्तगत करणे कठीण असते. पोलीस अधिकारी प्रामाणिकपणे आणि परिश्रमपूर्वक हे काम करतात आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून मुद्देमाल फिर्यादींना हस्तांतरित केला जातो. गुन्ह्याच्या तपासात मिळालेला मुद्देमाल जप्त करण्यापासून तो कोर्टात हजर करून पुन्हा मिळवण्यासाठी  परिश्रम करावे लागते. त्यामुळे चांगली कामगिरी करणारे पोलीस अधिकारी अभिनंदनाला पात्र आहेत.

Web Title: The attitude towards the police should change Opinion of Chandrakant Patal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.