खडकवासल्यातून पाणी सोडल्याने भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरुन वाहू लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 01:07 PM2024-07-25T13:07:06+5:302024-07-25T13:08:30+5:30

कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाल्याने दौंड,शिरुर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला

The Bhima and Mula-Mutha rivers began to overflow due to the release of water from Khadakvasla | खडकवासल्यातून पाणी सोडल्याने भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरुन वाहू लागली

खडकवासल्यातून पाणी सोडल्याने भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरुन वाहू लागली

पाटेठाण (पुणे): धरणक्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यात भीमा आणि मुळा - मुठा नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाल्याने दौंड,शिरुर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.
          
 खडकवासला धरणातून नद्यांना सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरुन वाहू लागली आहे.गुरुवार (दि. २५) रोजी धरणातून सोडण्यात आलेले व इतर उप नद्यांमधून भीमा नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे रात्रीेच्या सुमारास दौड तालुक्यात भीमा,मुळा मुठा नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आपत्ती व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या गावातील तसेच वस्तीवरील सर्व नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.पाण्याच्या वाढत्या प्रवाहात विठ्ठलवाडी,पाटेठाण,वडगाव बांडे,दहिटणे,राहू,आलेगाव येथील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे.

Web Title: The Bhima and Mula-Mutha rivers began to overflow due to the release of water from Khadakvasla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.