Purushottam Karandak 2024:‘पुरूषोत्तम’च्या रंगमंचावर ‘भ्रीडी’ एकांकिकेने जल्लोषात सुरवात

By श्रीकिशन काळे | Published: August 16, 2024 07:11 PM2024-08-16T19:11:07+5:302024-08-16T19:12:29+5:30

पहिल्या दिवशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने (मांजरी) ‘आता वाजव’, तर पुणे विद्यार्थी गृहाचे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पुणेने ‘बिजागरी’ ही एकांकिका सादर केली

the bhridi drama play on the stage of Purushottam karandak started with today | Purushottam Karandak 2024:‘पुरूषोत्तम’च्या रंगमंचावर ‘भ्रीडी’ एकांकिकेने जल्लोषात सुरवात

Purushottam Karandak 2024:‘पुरूषोत्तम’च्या रंगमंचावर ‘भ्रीडी’ एकांकिकेने जल्लोषात सुरवात

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला शुक्रवारी (दि. १६) जल्लोषात सुरुवात झाली. डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी ज्ञानप्रसाद बी-स्कूल, ताथवडेच्या संघाने सादर केलेल्या ‘भ्रीडी’ या एकांकिकेने स्पर्धेचा पडदा उघडला.

स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सायंकाळी 5 ते 8 या वेळात होत आहे. रविवारी सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 8 वेळात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे. मंजुषा जोशी, गोपाळ जोशी, अभिजित मकाशिर स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परिक्षक आहेत.

पहिल्या दिवशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने (मांजरी) ‘आता वाजव’, तर पुणे विद्यार्थी गृहाचे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पुणेने ‘बिजागरी’ ही एकांकिका सादर केली. दि. 16 ते दि. 30 ऑगस्ट या कालावधीत स्पर्धेत 51 एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.

शनिवारी (दि. 17) सी. ओ. ई. पी. टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे ‘जीवन साठे अंडर-ग्राऊंड’, झिल अभियांत्रिकी महाविद्यालय, नऱ्हे ‘परकी?’ आणि पी. ई. एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय ‘विमोचनम्’ एकांकिका सादर करणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी दि. 21 व 22 सप्टेंबर रोजी होणार असून दि. 28 सप्टेंबर रोजी प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

Web Title: the bhridi drama play on the stage of Purushottam karandak started with today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.