विद्युत दाहिनीचा फ्युज उडाल्याने मृतदेह अर्धवट जळाला; घाबरलेल्या कामगारासाठी वसंत मोरे आले धावून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:35 AM2023-02-23T10:35:11+5:302023-02-23T10:35:33+5:30
वसंत मोरेंच्या एका फोनवर एका तासात मशीन दुरुस्त होऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले
पुणे : कात्रजच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनीच्या मशीनचे फ्युज उडाल्याने मृतदेह अर्धवट जळाला होता. अशा परिस्थितीत घाबरलेल्या कामगाराने मनसेचे नेते वसंत मोरे यांना फोन करून सांगितले. नेहमीप्रमाणे अँक्शन मोडमध्ये असणारे मोरे कामगाराच्या मदतीसाठी धावून आले. आणि त्याला नोकरी गमावण्यापासून वाचवले. वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करून हे सांगितले आहे.
मंगळवारी रात्री कात्रज स्मशाभूमीमध्ये विद्युत दाहिनीत एक मृतदेह अंत्यविधीसाठी सोडण्यात आला. पण त्यावेळी अचानक दाहिनीच्या मशीनचे फ्यूज उडाले. आणि मृतदेह अर्धवट जळाला होता. अशा वेळी त्याठिकाणी असणारा कामगार प्रचंड घाबरला होता. कारण मशीन खराब झाल्यानंतर २ तास होऊन गेले तरी दुरुस्त करणारा आला नाही. त्याने मी सकाळी येईल आता येऊ शकत नाही. असे सांगून हात वर केले होते. अशा परिस्थितीत घाबरलेल्या या कामगाराने रात्री ११.३० वाजता मोरे याना फोन लावला. आणि वरील सर्व काही प्रकरण सांगितले. त्यानंतर वसंत मोरे अँक्शन मोडमध्ये आले. आणि त्यांनी थेट ठेकेदार आणि मेंटेनन्स वाल्याना फोन लावला. श्रीनिवास कंदुलसाहेब, दोन्हीही ठेकेदार यांना सांगितले, जर २ तासात मशीनमधील त्या मृदेहावर अंत्यसंस्कार पूर्ण झाले नाहीत. तर मी लाईव्ह येईल मग पुढे जे होईल त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असणार. आणि पुढील एक तासात गॅस दाहिनी पूर्ववत झाली. पण तोपर्यंत एकही स्थानिक लोकप्रतिनिधी जागेवर आला नाही असो ही आहे माझी सोशल मीडिया पॉवर असल्याचे मोरे यांनी फेसबुक पोस्ट करून सांगितले आहे.
कामगाराची नोकरी वाचली
मशीन खराब झाल्यानंतर मृतदेह अर्धवट जळाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे नातेवाईक सावडण्यासाठी येणार होते. त्यानंतर या मुद्द्याचे भांडवल करणारे अनेक कार्यतत्पर कार्यकर्ते पत्रकार घेऊन आले असते. ठेकेदारावर, मेंटेनन्स वाल्यावर कामगारांवर सर्वांवर कारवाईचा बडगा उगारला असता आणि त्यात ते लोक खुश झाले असते. त्यानंतर सर्वांसहित कामगारालाही नोकरी गमवावी लागली असल्याचे मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.