मुलगा आहे की राक्षस! सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईचा हात केला फ्रॅक्चर

By विवेक भुसे | Published: May 29, 2023 11:57 AM2023-05-29T11:57:12+5:302023-05-29T11:57:40+5:30

कामधंद्या न करणाऱ्या नराधम मुलाने आईकडे सिगारेटसाठी २० रुपये मागितले होते

The boy is a monster! Mother's arm fractured for not paying Rs 20 for cigarettes | मुलगा आहे की राक्षस! सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईचा हात केला फ्रॅक्चर

मुलगा आहे की राक्षस! सिगारेटला २० रुपये न दिल्याने आईचा हात केला फ्रॅक्चर

googlenewsNext

पुणे : सिगारेट घेण्यासाठी आईने २० रुपये दिले नाही, म्हणून आरडाओरडा केल्याने दोघा भावांमध्ये भांडणे सुरु होती. तेव्हा मध्ये आलेल्या आईच्या हाताचे मनगटावर थोरल्या मुलाने लाकडी बाबुंने मारहाण केल्याने त्यांचा हात फ्रॅक्चर झाला.

याबाबत सखुबाई राजाराम कांबळे (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माधव राजाराम कांबळे (वय २७) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरी असतात. त्यांचा मोठा मुलगा माधव हा काही कामधंदा करत नाही. त्याने फिर्यादी यांच्याकडे सिगारेटसाठी २० रुपये मागितले. त्यांनी न दिल्याने त्याने आरडाओरडा केला. तेव्हा फिर्यादी यांचा लहान मुलगा शंकर याने त्याला बाहेर जा , असे सांगितले. तेव्हा माधव हा बाहेरुन लाकडी बांबू घेऊन आला. माधव व शंकर यांच्यात भांडणे सुरु झाली. दोन भावांमध्ये सुरु असलेली भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी या मध्ये पडल्या. तेव्हा माधव याने आईच्या हाताचे मनगटावर लाकडी बांबु जोरात मारला. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title: The boy is a monster! Mother's arm fractured for not paying Rs 20 for cigarettes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.