पुलाचा कठडा तुटून पडला; पाटबंधारे व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वारकऱ्यांचा जीवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 08:37 PM2024-07-01T20:37:32+5:302024-07-01T20:38:17+5:30
संत तुकाराम महाराज पालखी वरवंड येथे मुक्कामी येत असून या तुटलेल्या कठड्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे
वरवंड: ता-दौंड श्री जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसाच वरवंड येथे मुक्कामी येत असून यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग शिक्षा दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी वरवंड येथे मुक्कामी येत असून चौफुला ता. दौंड येथे दुपारच्या वेळी पालखी सोहळा विसावा घेत असतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी व ग्रामस्थ भाविक भक्त या ठिकाणी चौफुला मध्ये दुपारच्या वेळी विसावा ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात याठिकाण ची वर्दळ व गर्दी पहाता एक धोकादायक घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्दळीच्या ठिकाणी असणारा सुपा रोड वरील खडकवासला कालव्यावर असणाऱ्या पुलाचा कठडा तुटून पडलेला आहे. याकडे पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. संबंधित अधिकारी जाणून याकडे दुर्लक्ष करीत आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य ग्रामस्थांना पडलेला आहे. पालखी सोहळ्याचे वारकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने काही अनुचित प्रकार होऊ नये तसेच प्रशासन पालखी सोहळ्या बाबत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठे उपाय योजना करीत असतात मात्र पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग दुर्लक्ष का करीत आहे. या पुलाच कठडा गेले पाच-सहा दिवस झाले तुटून पडलेला आहे. याकडे कोणीच लक्ष का दिले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.