तो मोका ८ सप्टेंबर २०२१ रोजी लावण्यात आला होता, तपास अधिकाऱ्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:11 AM2022-03-10T00:11:16+5:302022-03-10T00:11:54+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत पेन ड्राईव्ह देऊन त्यात ज्या गुन्ह्याबाबत आरोप केले. तो मोक्का पुण्यात गिरीश महाजन यांच्याशी संबंधित ९ जणांवर लावण्यात आला होता.देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी थेट मुंबई गाठून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली.
पुणे : ‘मविप्र’ संस्था काबीज करण्याच्या उद्दिष्टाने संचालकांचे राजीनामे घेण्यासाठी ॲड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केली, अशी फिर्याद ॲड. विजय भास्कर पाटील यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात दिली होती. या फिर्यातील तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात देण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचा आरोप देखील फिर्यादीत करण्यात आला होता. हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथक प्रमुख पोलीस उपायुक्त यांनी ३० ऑगस्ट २०२१ रोजी ९ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी पडताळणी केली. त्यात तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गाेकुळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भाेईटे व शिवाजी केशव भाेईटे या ९ जणांनी आपले संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असून तिचे मार्फतीने अवैध मार्गांनी अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी खंडणी, नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, जुलुम जबरदस्तीने शैक्षणिक संस्था बळकाविण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालू ठेवली आहेत. मागील १० वर्षाचे कालावधीमध्ये या ९ जणांवर ३ किंवा ३ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेले गुन्हे दाखल असून त्यांच्यावर एका पेक्षा जास्त दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन ८ सप्टेंबर २०२१ रोजी या ९ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच मोक्का कारवाई करण्यात आली आहे. त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्याकडे साेपविण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने ९ जानेवारी २०२२ रोजी पुणे व जळगाव येथे नीलेश भोईटेसह ५ जणांच्या घरी छापे घालून झडती घेतली. मविप्र संस्थेशी संबंधित कागदपत्रे व गुन्ह्याशी संबंधित साधने जप्त करण्यात आली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत पेन ड्राईव्ह देऊन त्यात ज्या गुन्ह्याबाबत आरोप केले. तो मोक्का पुण्यात गिरीश महाजन यांच्याशी संबंधित ९ जणांवर लावण्यात आला होता.देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी थेट मुंबई गाठून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली.