मृतांच्या कुटुंबाला कंपनीने जास्तीत जास्त मदत करावी; विधानसभेत हिंजवडीच्या आगीची रासनेंनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:36 IST2025-03-19T15:35:24+5:302025-03-19T15:36:23+5:30
गाडीत खरंच नादुरुस्त काय होतं का? याची पण शासनाने चौकशी करावी अशीही मागणी रासने यांनी केली

मृतांच्या कुटुंबाला कंपनीने जास्तीत जास्त मदत करावी; विधानसभेत हिंजवडीच्या आगीची रासनेंनी घेतली दखल
पुणे: हिंजवडीच्या व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल बसला आज सकाळी अचानक आग लागली होती. आगीत टेम्पो मधील ४ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. इतर जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले. चालकाच्या पायाखाली अचानक इंजिन आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणाची कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत दखल घेतली आहे. त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांसमोर हा मुद्दा उपस्थित केला. मृतांना कंपनीने जास्तीत जास्त मदत करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
रासने म्हणाले, माननीय अध्यक्ष महोदय आज सकाळी साडेसात वाजता हिंजवडीत व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मिनी बसला त्या गाडीच्या इंजिनला आग लागली. आग लागली कशी हे बघण्याकरीता ड्राइव्हर खाली उतरल्यानंतर ती आग भडकली. आणि त्या आगीमध्ये बसमध्ये असणाऱ्या सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे, राजू चव्हाण या चार जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण सुखरूप बाहेर पडले. या कंपनीने ज्या ४ जणांचा मृत्यू झाला. त्यांना कंपनीकडे शासनाने आदेश देऊन त्यांना जास्तीत जास्त मदत करून द्यावी. आणि ही जी गाडी होती या गाडीत खरंच नादुरुस्त काय होतं का? याची पण शासनाने चौकशी करावी. सन्माननीय सदस्यांनी दिलेल्या माहितीची शासनानी दखल घ्यावी व योग्य कारवाई करावी.