कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर पलटी; ४ तास वाहतूक ठप्प, पुणे नाशिक महामार्गारील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 03:55 PM2023-05-05T15:55:04+5:302023-05-05T15:55:53+5:30
कंटेनर दुपारी रस्त्यावरून बाजूला घेण्यात यश आले
अवसरी : पुणे - नाशिक महामार्गावर भोरवाडी ( अवसरी खुर्द) हद्दीत शुक्रवारी सकाळी नवीन ४ चाकी वाहतूक करणारा कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने चार तास वाहतुक कोंडी झाली.
चाकण येथून नवीन कार घेऊन नाशिक मालेगाव येथे कंटेनर निघाला होता. या कंटेनरमध्ये नवीन सफारी तसेच नेक्सोंन गाड्या घेऊन मालेगाव येथे निघाला होता. पुणे नाशिक महामार्गावर अवसरी खुर्द येथील भोरवाडी हद्दीत आली. भोर वाडी हद्दीत पुलाजवळ असणाऱ्या स्पीड ब्रेकर वर कार जात असताना मागून येणारा कंटेनर समोरील कारला वाचण्याच्या प्रयत्नात उजवीकडे ओढल्याने जागेवर पलटी झाला. त्यामुळे नाशिक बाजू कडून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. हा अपघात सकाळी घडला. पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे, हवालदार तुकाराम मोरे, पोलीस कॉन्स्टेबल गवारी, कारभळ, हवालदार हेमंत मडके, महामार्ग पोलिस सचिन डोळस, जयवंत कोरडे, भीमा आहेर आणि पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाचे काम पाहिले. कंटेनर दुपारी रस्त्यावरून बाजूला घेण्यात यश आले. त्यानंतर पुणे नाशिक रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.