लालचुटूक स्ट्राॅबेरीची मागणी वाढली; मात्र आवक कमी झाल्याने दरात वाढ
By अजित घस्ते | Published: December 24, 2023 07:07 PM2023-12-24T19:07:23+5:302023-12-24T19:07:34+5:30
स्ट्राॅबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लॅस्टिक ट्रेच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ
पुणे : नाताळनिमित्त लालचुटूक स्ट्राॅबेरी बालचमूंचे आकर्षण असते.त्यामुुळे नाताळात स्ट्राॅबेरीला देशभरातून मागणी वाढते. मात्र वातावरणातील बदलामुळे स्ट्राॅबेरीच्या लागवडीवर परिणाम झाला असून, मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने स्ट्राॅबेरीच्या दरात वाढ झाली आहे.
देशभरातून स्ट्राॅबेरीला मागणी वाढल्याने दरवाढ झाली आहे. स्ट्राॅबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लॅस्टिक ट्रेच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. एका ट्रेमध्ये प्लॅस्टिकची आठ छोटी खोकी (पनेट) असतात. एका पनेटमध्ये साधारणपणे २०० ग्रॅम फळे असतात. एका ट्रेचे दर प्रतवारीनुसार २०० ते ३०० रुपये दरम्यान आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एका ट्रेचा दर प्रतवारीनुसार १५० ते २०० रुपये दरम्यान होती अशी माहिती मार्केटयार्ड मधील फळ व्यापारी माऊली आंबेकर यांनी दिली. हवामान बदलामुळे आवक कमीस्ट्राॅबेरीची लागवड झाली असून यंदा स्ट्राॅबेरी लागवड झाल्यानंतर ढगाळ वातावरण पडले. थंडीत स्ट्राॅबेरीची लागवड चांगली होते, तसेच दर्जाही चांगला असतो. मध्यंतरी पडलेल्या ढगाळ वातावरणामुळे स्ट्राॅबेरीच्या दर्जावर परिणाम झाला आहे.
इथून होते आवक : स्ट्राॅबेरीला देशभरातून मागणी वाढली असून महाबळेश्वर, वाई, पाचगणी, भिलार याभागातून स्ट्राॅबेरीची आवक होते.
याराज्यात मागणी :अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या शहरांतून स्ट्राॅबेरीला मागणी आहे. यापरराज्यांत विक्रीस पाठवली जातात.