डीजेचा आवाज वाढला अन् कान झाला बधिर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 11:51 AM2023-10-01T11:51:52+5:302023-10-01T11:52:03+5:30

तज्ज्ञांच्या मते आता अशांना काही वर्षांनी कर्णबधिरता येण्याचा धाेका निर्माण झाला आहे.

The DJ's voice grew louder and deafened | डीजेचा आवाज वाढला अन् कान झाला बधिर

डीजेचा आवाज वाढला अन् कान झाला बधिर

googlenewsNext

पुणे : डाॅक्टर माझ्या कानात शिट्टी वाजल्याचा आवाज येताेय, मला ऐकायला कमी येतंय, कान दुखताेय, चक्कर येतेय, अशा तक्रारी घेऊन तरुणाई फॅमिली डाॅक्टरांसह कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे येत आहेत. कारण? विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे व पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर बेधुंद हाेऊन तासनतास नाचणे. तज्ज्ञांच्या मते आता अशांना काही वर्षांनी कर्णबधिरता येण्याचा धाेका निर्माण झाला आहे.

विसर्जन मिरवणुकीमध्ये दाेन दिवस डीजे आणि पारंपरिक वाद्यांचा आवाज प्रचंड घुमला. ताे आवाज दाेन दिवस अगदी ८३ डेसिबलपासून १२९ डेसिबल इतका प्रचंड हाेता. त्यामध्ये तरुणाईने यथेच्छपणे थिरकण्याचा अनुभव घेतला. आता त्याचे दुष्परिणाम देखील भाेगावे लागत आहेत. ऐकायला कमी येण्यासारखे अनेकांना लक्षणे आहे.

Web Title: The DJ's voice grew louder and deafened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.