जिल्हा परिषदेची प्रारुप गट - गण रचना निवडणूक आयोगाला सादर करण्यापर्वीच इच्छुकांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:12 PM2022-02-03T18:12:01+5:302022-02-03T18:13:02+5:30

अनेक राजकीय नेत्यांनी ही प्रारुप गट-गण रचना सोशल मिडीयात व्हायरल देखील केली आहे.

The draft group composition of pune zilla parishad is in the hands of the aspirants only after submitting it to the Election Commission | जिल्हा परिषदेची प्रारुप गट - गण रचना निवडणूक आयोगाला सादर करण्यापर्वीच इच्छुकांच्या हाती

जिल्हा परिषदेची प्रारुप गट - गण रचना निवडणूक आयोगाला सादर करण्यापर्वीच इच्छुकांच्या हाती

googlenewsNext

सुषमा नेहरकर- शिंदे 

पुणे : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट-गणांची प्रारुप रचना तयार करून दोन दिवसांत राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाच्या नवीन कायद्यानुसार पुणे जिल्ह्यात गटांची संख्या 7 ने तर गणांची संख्या 14 वाढणार असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या गट-गण रचनेत मोठे फेरबदल होणार असल्याने इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही तालुक्यातील प्रारुप गट-गण रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर होण्यापूर्वीच इच्छुकाच्या हाती लागली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी ही प्रारुप गट-गण रचना सोशल मिडीयात व्हायरल देखील केली आहे. 

पुणे महापालिकेची प्रभाग रचना निवडणूक आयोगाने जाहिर करण्यापूर्वीच राजकीय लोकांच्या हाती पडली होती. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या गट-गण रचनेमध्ये एक पाऊल पुढे जात आयोगाला, जिल्हा प्रशासनाला सादर होण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांच्या हाती पडली आहे. राज्य शासनाने गट-गणांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. मंत्री मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी राज्यपालांकडे सहीसाठी पाठवला. परंतु राज्यपालांनी सही न केल्याने गट-गण रचना रखडली होती. अखेर 31 जानेवारी रोजी राज्यपालांनी सही गेल्याने गट-गणांच्या वाढीवर शिक्कामोर्तब झाला. त्यानुसार आयोगाने वाढीव संख्येनुसार गट-गणांची प्रारुप रचना जाहिर करून आयोगाला सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. 

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित तहसिलदार व प्रांताधिकारी यांना गट-गण रचना करण्याचे आदेश दिले. सध्या तालुकास्तरावर हे काम सुरू असून , वाढीव संख्येनुसार प्रारुप गट-गण निश्चित झाले आहेत. शुक्रवार पर्यंत सर्व प्रांताधिकारी जिल्हा प्रशासनाला हे सादर करतील, परंतु त्यापूर्वीच ही प्रारुप गट-गण रचना इच्छुकांच्या हाती पडली आहे.

Web Title: The draft group composition of pune zilla parishad is in the hands of the aspirants only after submitting it to the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.