घर घेण्याचं स्वप्न आणखी महाग, रेडीरेकनर दरांत सरासरी ५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 07:33 AM2022-04-01T07:33:52+5:302022-04-01T07:34:32+5:30

राज्यभरात रेडीरेकनर दरांत सरासरी ५ टक्के वाढ

The dream of buying a house is even more expensive, with an average increase of 5% in redireckoner rates | घर घेण्याचं स्वप्न आणखी महाग, रेडीरेकनर दरांत सरासरी ५ टक्के वाढ

घर घेण्याचं स्वप्न आणखी महाग, रेडीरेकनर दरांत सरासरी ५ टक्के वाढ

googlenewsNext

पुणे : राज्य शासनाकडून दरवर्षी १ एप्रिलपासून नवीन रेडीरेकनर दर (वार्षिक मूल्यदर तक्ते) जाहीर केले जातात. त्यानुसार सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत राज्यात रेडीरेकनर दरात सरासरी ५ टक्के वाढ करण्यात आली. यात राज्यातील महापालिका क्षेत्रात ८.८० टक्के वाढ, ग्रामीण भागात ६.९६ टक्के, तर नगरपालिका क्षेत्रात ३.६२ टक्के वाढ करण्यात आली. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी राज्यातील रेडीरेकनरची माहिती दिली.

कोरोनामुळे गतवर्षी रेडीरेकनरमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. परंतु कोरोनाचे संकट कमी झाले असून, राज्य निर्बंधमुक्त झाले आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत झालेले व्यवहार, पाच वर्षांत झालेला विकास, रस्ते विकास, मेट्रो सिटी, जमीन खरेदी-विक्रीच्या ऑनलाइन जाहिरात या सर्वांचा विचार करून वस्तुनिष्ठ रेडीरेकनर जाहीर करण्याचा प्रयत्न केल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.

सरकारने दोन दिवसांत काढले ३२० जीआर
मुंबई : राज्य सरकारने गतिमानतेचा परिचय देत आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत तब्बल ३२० जीआर काढले. ३० तारखेला १७७ जीआर काढले, तर गुरुवारी १४३ जीआर काढण्यात आले. मंत्रालयातील विविध विभागांचे काम मध्यरात्रीनंतरही सुरू होते.

विजेचे दर कमी होणार
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महावितरणचे वीजदर दोन टक्क्यांनी कमी होणार आहेत. मुंबईकर वापरीत असलेल्या टाटाचे वीजदर चार टक्क्यांनी स्वस्त होत असून अदानीच्या दरात मात्र वाढ होणार आहे. बेस्ट 
वीजदर स्थिर राहणार आहेत.

रेडीरेकनर दर
n सर्वाधिक वाढ : 
पुणे जिल्हा (८.१५ टक्के)
n सर्वात कमी वाढ 
हिंगोली जिल्हा (०.३८ टक्के)
n महापालिका क्षेत्रात सर्वाधिक वाढ मालेगाव (१३.१२ टक्के)
मुंबई महानगरातील दर
८६४ झोनमध्ये २० ते २२%नी घट
पुणे शहरातील दर
८ झोनमध्ये १० टक्क्यांनी घट
शहरी भागांत कचरा डेपो, 
स्मशानभूमी, दफनभूमी, कत्तलखाना, एसटीपी प्लान्टलगत १०० मीटर परिसरातील मिळकतीच्या रेडी रेकनर दरांत राज्यात २५ टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे.

Web Title: The dream of buying a house is even more expensive, with an average increase of 5% in redireckoner rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.