‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष महागात पडला! लोणावळ्यात ३६२ जणांना दंडाचा दंडुका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 11:46 AM2024-01-02T11:46:44+5:302024-01-02T11:47:31+5:30

लोणावळ्यात थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी झाली होती...

The excitement of 'thirty first' was expensive! Penalty baton to 362 people in Lonavala | ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष महागात पडला! लोणावळ्यात ३६२ जणांना दंडाचा दंडुका

‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष महागात पडला! लोणावळ्यात ३६२ जणांना दंडाचा दंडुका

लोणावळा (पुणे) :लोणावळा शहरात थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ३६२ जणांना शहर पोलिसांनी दंडाचा प्रसाद दिला. दि. ३० व ३१ डिसेंबररोजी दंडात्मक कारवाई करत २ लाख ६१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

लोणावळ्यात थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी झाली होती. वाहतुकीस अडथळा, वाहन परवाना जवळ न बाळगणे, नो एन्ट्री, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत विरुद्ध दिशेने वाहन चालवणे यासह दारू पिऊन वाहन चालवणे, असे प्रकार करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलन मशीनद्वारे ही कारवाई करण्यात आली.

लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक व पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे सहायक उपनिरीक्षक रमेश भिसे, अनिल शिंदे, सचिन कडाळे, अमोल फाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. लोणावळ्यात वाहतूक नियोजनासाठी नगरपरिषद वॉर्डन, पोलिस मित्र व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी मदत केली.

Web Title: The excitement of 'thirty first' was expensive! Penalty baton to 362 people in Lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.