शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 11:34 PM2024-05-02T23:34:13+5:302024-05-02T23:35:08+5:30
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज गुरुवार (दि.२) रोजी खा. सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबवलेल्या धोरणांवर सडकून टीका केली.
नीरा : शेतमाल पिकवणारा शेतकरी टिकला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळायला हवा, मात्र सध्याचे मोदी सरकार शेतमाल पिकवणारा महत्व देत नाही तर फक्त खाणाऱ्यांना महत्त्व देते. त्यामुळे शेतकऱ्यांची हाल होत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या. अस आवाहन माजी कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज गुरुवार (दि.२) रोजी खा. सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबवलेल्या धोरणांवर सडकून टीका केली. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारा निमित्त नीरा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बोलत होते.
सुप्रिया सुळे यांनी देखील केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. केंद्र सरकारने इथेनॉल बाबत जे धोरण राबवले त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला ३०० रुपयाने कमी भाव मिळाल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. तर यापुढे सर्व निवडणुका सर्व तकतीनिशी लढवल्या जातील. ग्रामपंचायती पासून विधानसभा त्याच बरोबर सहकारातील साखर कारखाने व जिल्हा बँकेची निवडणूक देखील आपण लढवणार असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवार यांना आव्हान दिले. लोकांनी कोणाच्या धमक्यांना घाबरु नये जे धमक्या देतायत त्यांना सांगा विधानसभा लांब नाही. तिथे दाखवून देऊ अस म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.