भंगार विक्रेत्याचा पराक्रम; तब्बल साडेबारा कोटींचा GST बुडविला, पुण्यातील खळबळजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:54 PM2023-03-13T12:54:23+5:302023-03-13T12:59:02+5:30

भंगार विक्रेत्या व्यापाऱ्याला पुणे जीएसटी विभागाने थेट उत्तर प्रदेशातून अटक

The Feat of a Scrap Dealer As many as twelve and a half crores GST sunk Sensational type in Pune | भंगार विक्रेत्याचा पराक्रम; तब्बल साडेबारा कोटींचा GST बुडविला, पुण्यातील खळबळजनक प्रकार

भंगार विक्रेत्याचा पराक्रम; तब्बल साडेबारा कोटींचा GST बुडविला, पुण्यातील खळबळजनक प्रकार

googlenewsNext

पुणे : अनेक बोगस कंपन्यांकडून तब्बल ७० कोटी २२ लाखांची खरेदी बिले घेऊन शासनाचा कोट्यवधींचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणाऱ्या एका भंगार विक्रेत्या व्यापाऱ्याला पुणेजीएसटी विभागाने थेट उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. या विभागाने अशा प्रकारे परराज्यात जाऊन केलेली ही पहिलीच कारवाई 
आहे.

सिराजुद्दीन कमालुद्दीन चौधरी असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. चौधरी याची ‘ओलायन डेस्कॉन इंडस्ट्रीयल’ कंपनी आहे. त्याने बनावट बिले सादर करून १२ कोटी ५९ लाखांचा जीएसटी कर बुडविला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पुणे शहर सोडून फरार झाला होता. जीएसटी विभागाच्या अन्वेषण विभागाने विशेष शोधमोहीम राबवली. तो उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी गेला असल्याची शक्यता लक्षात घेऊन एक पथक सिद्धार्थनगर जिल्ह्यातील जबजुआ गावी रवाना झाले. तेथे चौधरी याच्या घरावर ३ दिवस पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. पुण्यात आणून त्याला न्यायालयासमोर हजर केले. ॲड. महेश झंवर यांनी काम पाहिले. न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई अपर राज्य कर आयुक्त धनंजय आखाडे, राज्य कर सहआयुक्त दीपक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर उपायुक्त मनीषा गोपाळे-भोईरे यांच्या देखरेखीखाली राज्य कर सहायक आयुक्त सचिन सांगळे, दत्तात्रय तेलंग, सतीश लंके, सतीश पाटील आणि राज्य कर निरीक्षकांच्या पथकाने केली.

Web Title: The Feat of a Scrap Dealer As many as twelve and a half crores GST sunk Sensational type in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.