Purushottam Karandak: आरे आवाज कुणाचा...! ‘पुरुषोत्तम’ची अंतिम फेरी २१, २२ सप्टेंबरला
By श्रीकिशन काळे | Published: September 15, 2024 03:33 PM2024-09-15T15:33:39+5:302024-09-15T15:34:19+5:30
स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे ५९ वे वर्ष आहे
पुणे: महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, दि. २१ व रविवार, दि. २२ सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे ५९ वे वर्ष आहे.
‘पुरूषोत्तम करंडक’ ही स्पर्धा कॉलेज तरूणाईसाठी सर्वाधिक आकर्षणाची असते. त्यासाठी अनेकजण खूप दिवसांपासून तयारी करत असतात. निवड फेरी झाली असून, आता स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.२८) सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजिला असून पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.
शनिवारी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सायंकाळी ५ ते ८
-सखा (आय. एम. सी. सी.)
-तेंडुलकर्स् (म. ए. सो.चे सिनिअर कॉलेज)
- ११,१११ (फर्ग्युसन महाविद्याल)
रविवारी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सकाळी ९ ते ११
-पार्टनर (स. प. महाविद्यालय, पुणे)
-तृष्णाचक्र (डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर)
-पाटी (विद्या प्रतिष्ठान कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती)
वेळ : सायंकाळी ५ ते ८
-देखावा (न्यू आर्टस् कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर)
-बस नं. १५३२ (गरवारे वाणिज्य महाविद्यालय)
-बिजागरी (बी. व्ही. जी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी)