पाषाणमधील गुंडावर एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध
By विवेक भुसे | Published: December 13, 2023 12:11 PM2023-12-13T12:11:36+5:302023-12-13T12:12:08+5:30
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चाकू, पिस्तुल अशा घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत
पुणे: औध, बाणेर, पाषाण, बाणेर परिसरात दहशत निर्माण करुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अट्टल गुंडाला पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एम पी डी ए अन्वये कारवाई करुन स्थानबद्ध केले आहे.
आदित्य ऊर्फ राज कुमार मानवतकर (वय २०, रा. संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, पाषाण) असे या गुंडाचे नाव आहे. त्याची एक वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आदित्य मानवतकर याच्याविरुद्ध गेल्या ५ वर्षात ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चाकू, पिस्तुल अशा घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दंगा, बेकायशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एम पी डी ए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन मानवतकर याला एक वषार्साठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी आतापर्यंत ६८ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.