मुलगी 'पप्पा' म्हणत बिलगली अन् वडिलांचे डोळे आनंदाने भरून आले! जन्मानंतर ६ वर्षांनी झाली भेट

By नम्रता फडणीस | Published: May 31, 2023 05:00 PM2023-05-31T17:00:55+5:302023-05-31T17:01:33+5:30

मुलीच्या भवितव्याचा विचार करत विभक्त झालेल्या पती - पत्नीने पुन्हा एकत्र होण्याचा निर्णय घेतला

The girl shouted Daddy and the father eyes were filled with happiness Met 6 years after birth | मुलगी 'पप्पा' म्हणत बिलगली अन् वडिलांचे डोळे आनंदाने भरून आले! जन्मानंतर ६ वर्षांनी झाली भेट

मुलगी 'पप्पा' म्हणत बिलगली अन् वडिलांचे डोळे आनंदाने भरून आले! जन्मानंतर ६ वर्षांनी झाली भेट

googlenewsNext

पुणे : चिमुकलीचा जन्म झाला. पण, तिच्या जन्मापूर्वीपासून अभियांत्रिकी पती-पत्नी वेगळे राहात होते. मुलीच्या भवितव्याचा विचार करून दोघांनी पुन्हा एकत्र होण्याचा निर्णय घेतला अन् दोघांनी  एकमेकांविरोधातील दावे काढून घेतले.  सहा वर्षानंतर पहिल्यांदाच मुलगी आणि तिच्या पित्याची भेट झाली. मुलगी वडिलांना "पप्पा' म्हणत बिलगली अन त्याचे डोळे आनंदाने भरून आले.

राहुल (वय 36) आणि प्रिया  (वय 32) (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही उच्चशिक्षित . तो तामिळनाडू येथील आहे. तर ती पुण्यात राहते. 2015 मध्ये दोघांचे पारंपारिक पध्दतीने विवाह झाला. काही दिवस संसार सुरळीत केल्यानंतर किरकोळ कारणावरून दोघात वाद झाले. त्यानंतर तो मूळगावी तामिळनाडू येथे निघून गेला. तर गरोदर असलेली ती माहेरी गेली. 2016 पासून दोघे विभक्त राहू लागले. तिला 2017 मध्ये मुलगी झाली. त्याने तामिळनाडू येथे घटस्फोटाचा दावा दाखल केला. तिने नांदायला तयार असल्याची केस पुणे येथील न्यायालयात केली. तिला आणि जन्मलेल्या मुलीला पोटगी मागितली. तिने सर्वोच्च न्यायालयात दाद मागून तामिळनाडू येथील केस पुण्यात ट्रान्सफर करून घेतली. तो हजर झाला. त्याचे समुपदेशन करण्यात आले. मात्र, त्याला यश आले नाही. घटस्फोटासाठी तिला चेन्नई येथे फ्लॅट आणि दागिने मिळून 1 कोटी रुपयांची संपत्ती देण्याची तयारी दर्शविली.

मात्र, ती नांदण्यावरच ठाम होती. दोघांना त्यांच्या वकिलांनी समजावून सांगितले. ते दोघे एकत्र राहण्यास तयार झाले. त्यांनी नव्याने संसार सुरू केला. त्यानंतर एकामेकांच्या विरोधातील केसेस काढून टाकल्या. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी.बी.येरलेकर यांच्या न्यायालयात या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

''समुपदेशनामुळे सात वर्षांपासून वेगळे राहणारे पती-पत्नी एकत्र आले आहेत. दोघांनी नव्या जोमाने पुन्हा संसासर सुरू केला आहे. मुलीचे भविष्यही सुखकर बनणार आहे. समुपदेशनामुळे वेळ, पैशाची बचत होते. त्याबरोबरच होणाऱ्या त्रासातून सुटका होते. दोन्ही बाजूचे पक्षकार आनंदी असतात- अँड.राणी कांबळे-सोनावणे, पतीच्या वकील.''

Web Title: The girl shouted Daddy and the father eyes were filled with happiness Met 6 years after birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.