‘आयुष्मान भारत’चा गवगवा, पेशंटला उपचार मात्र मिळेना; कार्ड काढण्यासाठी मात्र यंत्रणेवर प्रेशर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:18 PM2024-02-26T12:18:19+5:302024-02-26T12:20:28+5:30

दुसरीकडे हाॅस्पिटल या कार्डधारकांना अक्षरश: हाकलून लावत आहेत. त्यामुळे त्यांना पैसे देऊन उपचार घ्यावे लागत आहेत....

The glory of 'Ayushman Bharat', but the patient does not get treatment; However, pressure on the system to remove the card | ‘आयुष्मान भारत’चा गवगवा, पेशंटला उपचार मात्र मिळेना; कार्ड काढण्यासाठी मात्र यंत्रणेवर प्रेशर

‘आयुष्मान भारत’चा गवगवा, पेशंटला उपचार मात्र मिळेना; कार्ड काढण्यासाठी मात्र यंत्रणेवर प्रेशर

पुणे :आयुष्मान भारत कार्ड काढून घ्या, सरकारीसह खासगी दवाखान्यांतही पाच लाखापर्यंतचे माेफत उपचार मिळवा’ ‘आता उपचारांच्या खर्चाची चिंता मिटली’ अशा जाहिराती शासनाकडून केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात आयुष्मान भारत कार्डचा मात्र सर्वसामान्य नागरिकांना काडीचाही उपयाेग हाेत नसल्याचे समाेर आले आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिक त्यांना माेफत उपचार मिळतील याचा विचार करून हाॅस्पिटलचे उंबरे झिजवत आहेत. दुसरीकडे हाॅस्पिटल या कार्डधारकांना अक्षरश: हाकलून लावत आहेत. त्यामुळे त्यांना पैसे देऊन उपचार घ्यावे लागत आहेत.

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यासाठी व योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना पॅनेलकृत रुग्णालयांद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार देण्यात येतील, अशी घाेषणा करत केंद्र शासनाने २३ सप्टेंबर २०१८ रोजी ही याेजना सुरू केली होती. परंतू, ते कार्ड केवळ शाेभेची ठरत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. तसेच या याेजनेच्या समन्वयाचे काम महात्मा फुले जन आराेग्य याेजनेकडे दिले आहे.

कार्ड काढण्यासाठी यंत्रणेवर दबाव

आयुष्मान भारत याेजनेचा महाराष्ट्रात नुसताच गवगवा केला जात असून, आराेग्य यंत्रणेला वेठीस धरून नागरिकांचे कार्ड मात्र काढण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून संबंधित यंत्रणांवर दबाव टाकला जात आहे. त्यांना टार्गेट दिले जात आहे.

- पुणे जिल्ह्यात आयुष्मान भारत याेजनेचे कार्ड काढण्यात आलेल्या कुटुंबीयांची संख्या- ११ लाख ९८ हजार ३०३

- महात्मा फुले जन आराेग्य याेजनेतून व आयुष्मान भारत याेजनेतून उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या- ७८ हजार ९३०,

एकूण मंजूर रक्कम : १८४ काेटी ३४ लाख ४८ हजार ६६० (कालावधी १ एप्रिल २०२३ ते आतापर्यंत)

आमच्याकडे ‘आयुष्मान भारत याेजने’चे कार्ड आहे. एक महिन्यापूर्वी माझ्या पतीच्या पायाला लागल्याने त्यांना ससून रुग्णालयात ॲडमिट केले हाेते. हे कार्ड तेथे दाखवले; परंतु यातून उपचार हाेत नाही, असे आम्हाला सांगितले. शेवटी महात्मा फुले याेजनेतून उपचार झाले.

- प्रीती विनाेद चव्हाण, औंध

‘आयुष्मान भारत याेजने’चे केवळ कार्डच मिळते; परंतु प्रत्यक्ष उपचार मिळत नाही. ज्या प्रकारे जाहिरात सुरू आहे, तसे काहीच नाही. कारण यामध्ये एकही हाॅस्पिटल नाही. येत्या मार्चनंतर हा लाभ दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे. उपचारासाठी प्रत्यक्षात तरतूद किंवा मार्गदर्शक तत्त्वे काढलेली नाहीत. लाेकांना वाटत आहे की पाच लाखांचे उपचार माेफत मिळतील, म्हणून ते हाॅस्पिटलचे उंबरे झिजवतात परंतु, पदरी निराशा पडते.

- आनंद बाखडे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक, सीफार

महात्मा फुले जन आराेग्य याेजनेतून रुग्णांना लाभ मिळताे; पण यामध्ये ठराविकच हाॅस्पिटल आहेत. आयुष्मान भारत याेजनेतून तर काहीच लाभ मिळत नाही. आयुष्मान याेजनेत केशरी रेशन कार्डधारकांचाही समावेश करणार, अशी घाेषणा शासनाने केली हाेती त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. शासनाने ही आयुष्मान भारत गंभीरपूर्वक राबवायला हवी.

- दीपक जाधव, आराेग्य क्षेत्रातील कार्यकर्ते

आयुष्मान भारत ही याेजना इतर राज्यांत सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात आधीपासून महात्मा फुले याेजना असल्याने आयुष्मान भारत याेजना लागू न करता ती महात्मा फुले जन आराेग्य याेजनेत समाविष्ट केली आहे. त्यामुळे सुरुवातीला रुग्णाला महात्मा फुले जन आराेग्य याेजनेत दाखल केले जाते आणि जर या याेजनेतील दीड लाखाचा फंड संपला व त्याला आणखी उपचार घ्यायचे असल्यास त्याला आयुष्मान भारत याेजनेतून उपचार दिले जातात. अशी किती रुग्णांनी उपचार घेतले याची स्वतंत्र माहिती उपलब्ध नाही.

- एक अधिकारी, महात्मा फुले जन आराेग्य याेजना

 

Web Title: The glory of 'Ayushman Bharat', but the patient does not get treatment; However, pressure on the system to remove the card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.