सोन्याची झळाळी; आकर्षक झुंबर! पुण्यातील सदाशिव पेठेत अवतरले तिरुपती बालाजी मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 01:20 PM2022-09-02T13:20:36+5:302022-09-02T13:37:56+5:30

तुम्हाला तिरुपती - बालाजी मंदिरामध्ये जाण्याचा योग आला नसेल तर आता ते मंदिर प्रत्यक्षात दिसतं कसं याचा अनुभव तुम्हाला पुण्यातच मिळणार

The glory of the Tirupati Balaji Temple incarnated in Narayan Peth in Pune | सोन्याची झळाळी; आकर्षक झुंबर! पुण्यातील सदाशिव पेठेत अवतरले तिरुपती बालाजी मंदिर

सोन्याची झळाळी; आकर्षक झुंबर! पुण्यातील सदाशिव पेठेत अवतरले तिरुपती बालाजी मंदिर

googlenewsNext

पुणे: तुम्हाला तिरुपती - बालाजी मंदिरामध्ये जाण्याचा योग आला नसेल तर आता ते मंदिर प्रत्यक्षात दिसतं कसं याचा अनुभव तुम्हाला पुण्यातच मिळणार आहे. हो तशीच अवघ्या मंदिराला सोन्याची झळाळी, आकर्षक हिऱ्यांप्रमाणे चकाकणारे झुंबर, देवदेवतांचे छोटी-छोटी मंदिरे आणि प्रवेशव्दारावर गरुड स्तंभ, पुष्कर्णी तलाव त्यातील उंच उडणारे कारंजे यापासून हे सारं तुम्हाला पाहता येणार आहे. सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या देखाव्यामध्ये.

रस्त्याला अडथला येऊ नये यासाठी पुण्यामध्ये सर्वात पहिल्यांदा याच मंडळाच्या वतीने हॅंगीग स्टेज व त्यावर भव्य देखावा तयार करण्यात येणार आहे.  यंदाही त्यांनी ही संकल्पना घेऊन तिरुपती बालाजी मंदिर तयार केले आहे. जमिनीपासून सुमारे पंधरा फुट उंच असलेल्या या मंदिरावर पायऱ्या चढून जाताना त्यावरील दगडी रंगाचे डिजीटल जणू डोंगर चढण्याचा फील देते. डोंगर चढून गेल्यावर गोपूरातून मंदिरात प्रवेश होतो. समोर उंचच उंच गरुडध्वज नजरेस पडतो. त्यानंतर मुख्य मंदिराकडे जाताना प्रथम मंदिराचे भव्य सभामंडप लागते याच मंडपात देशातील सर्वात श्रीमंत मंदिराची उपाधी का लागते ते वैभव नरजेस पडते. जणू सोन्याचा मुलामा लावलेले खांब आणि झुंबर यांनी डोळे दीपून जातात. तेथून थेट गाभाऱ्यात प्रवेश होतो आणि नरजेत भरते ती साडेसात फुटांची बालाजीची मुर्ती. तेच वैभवाचे प्रतिक असणारे हिरेजडीत सोनेरी मुकुट, हिऱ्या-मोत्यांचे हार आणि इतर आभुषणामुळे मुर्ती डोळ्यात साठविताना कित्येक मिनिट मर्तीसमोर थांबायला होते. दर्शन घेतल्यावर मंदिराला प्रदक्षिणा होईल अशा पद्दतीचा एक्झीट सुरु होतो. बाहेर जाताना पुन्हा महालक्ष्मी आणि कुबेर मंदिराचे दर्शन होते. तेथून पुढे पुष्कर्णी तलाव आणि उंच कारंजा मनाला प्रसंन्न करतात तेथून पुन्हा डोंगर उतरून खाली उतरल्यावर तेथेच बालाजी मंदिरात दिला जातो तसाच प्रसादही दिला जातो या संपूर्ण प्रवासात बालाजी मंदिरातील वाद्यांचा तोच ध्वनी लाईव्ह वाजत असतो. शिवाय मंदिरात येतानाच कुमठेकर रस्त्यावर भव्य गोपूर नजरेत भरते. हा देखावा मुंबईचे अमन विधाते यांनी साकारला असून पुण्यातील मिरॅकल इव्हेंट विनायक रासकर यांनी गोपूर आणि इतर बाबींसाठी सहकार्य केले. यासाठी मंडळ प्रमुख सल्लागार मेघराज निंबाळकर किशोर हिंगे, संग्राम शिंदे, अक्षय निंबाळकर यांनी सहकार्य केले.

''मंदिरातील विष्णूच्या मुर्तीची प्रतिष्ठापना इस्कॉन मंदिरातील गुरुजींच्या हस्ते विधीपुर्वक करण्यात आली. आजही सकाळ सायंकळ बालाजी मंदिराप्रमाणेच विधीवत पूजा होते. बालाजी मंदिर ज्यांनी पाहिले नाही अशांनी आणि ज्यांनी पाहिले आहे त्यांनीही पुन्हा ते वैभव पाहण्यासाठी जरुर यावे. - युवराज निंबाळकर (मंडळाचे अध्यक्ष)''  

मंडळाचे नाव : छत्रपती राजाराम मंडळ
ठिकाण : कुमठेकर ररस्ता, सदाशिव पेठ.
देखाव्याची वेळ : २४ तास (रात्री दहा ते सकाळी सहा फक्त वाद्य बंद)

Web Title: The glory of the Tirupati Balaji Temple incarnated in Narayan Peth in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.