स्थापनेपासून दिलीप वळसे पाटलांकडे असणारी ग्रामपंचायत निसटली; सरपंचपदी रवींद्र वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 03:52 PM2023-11-06T15:52:24+5:302023-11-06T15:52:55+5:30

दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या रवींद्र जनार्दन वळसे पाटील यांनी प्रस्थापितांना मोठा धक्का देत लोकनियुक्त सरपंचपदी विजय मिळवला

The Gram Panchayat which had been held by Dilip Walse Patil since its inception, escaped; Sarpanchpadi Rabindra Valse Patil | स्थापनेपासून दिलीप वळसे पाटलांकडे असणारी ग्रामपंचायत निसटली; सरपंचपदी रवींद्र वळसे पाटील

स्थापनेपासून दिलीप वळसे पाटलांकडे असणारी ग्रामपंचायत निसटली; सरपंचपदी रवींद्र वळसे पाटील

निरगुडसर : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या रवींद्र जनार्दन वळसे पाटील यांनी प्रस्थापितांना मोठा धक्का देत लोकनियुक्त सरपंचपदी विजय मिळवला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्थापनेपासून असलेली सत्ता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हातुन प्रथमच निसटली आहे. सरपंच पदासाठी निरगुडसर मध्ये तिरंगी लढत झाली त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निरगुडेश्वर ग्रामविकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार संतोष बबनराव टाव्हरे यांचा शिंदे गटाच्या रवींद्र वळसे पाटील यांनी १३५ मतांनी पराभव केला. सरपंच पदाचे उमेदवार संतोष टाव्हरे यांना (१३४८)मते मिळाली तर विजयी उमेदवार रवींद्र वळसे पाटील यांना (१४८३)मते मिळाली.अपक्ष उमेदवार निलेश भिवसेन वळसे यांना (१८४)मते मिळाली.निरगुडसर ग्रामपंचायत १३सदस्य संख्येपैकी तीन जागा बिनविरोध निवड झाली

उर्वरित दहा जागांसाठी २० उमेद्ववार रिंगणात होते.त्यामध्ये निरगुडेश्वर पॅनेलचे दहा उमेदवार रिंगणात होते तर शिंदे गटाच्या धर्मराज पॅनलचे पाच उमेद्ववार रिंगणात होते.इतर अपक्ष पाच उमेद्ववार रिंगणात होते.विजयी झालेल्या उमेदवारांपैकी निरगुडेश्वर पॅनलचे चार उमेद्ववार विजयी झाले आहेत त्यामध्ये- १)राहुल झुंजार राव हांडे यांना-(३१६)मते मिळाली.२)सौ.पुजा बाबाजी थोरात यांना (३२४) वैभव हरीभाऊ टाव्हरे (३९७) भाऊसाहेब फकिरा वळसे (३८३)मते मिळाली.धर्मराज पॅनलच्या १)सारिका प्रकाश कडवे (३३१) संतोष किसन कोरके (३०६)शिल्पा महेश राऊत (३०९)मते मिळाली.तर इतर विजयी अपक्ष उमेदवार अक्षदा सुभाष टाव्हरे यांना (२९३)मते मिळाली.अशोक मधुकर टाव्हरे(४०२)अशोक ज्ञानेश्वर कानसकर यांना (३८४) मते मिळाली. निरगुडेश्वर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व विवेक वळसे पाटील करत होते तर धर्मराज पॅनलचे नेतृत्व स्वतः रवींद्र वळसे पाटील करत होते.

दरम्यान निरगुडसर ग्रामपंचायत निवडणूकीत एक धक्का दायक विजय समोर आला आहे. वार्ड क्रमांक चार मध्ये निरगुडेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या वतीने सर्वसाधारण महिला या जागेसाठी उषा अनिल टाव्हरे ह्या उमेदवार म्हणून रिंगणात होत्या त्यांच्या समोर अपक्ष उमेदवार अक्षदा सुभाष टाव्हरे यांनी आवाहन दिले होते.मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निरगुडेश्वर ग्रामविकास पॅनेलच्या वतीने त्यांची समजुत काढत पॅनेलच्या उमेदवार उषा टाव्हरे यांना जाहीर पाठिंबा अपक्ष उमेदवार अक्षदा टाव्हरे यांनी दिला होता.मात्र मतदार जनतेने हा निर्णय मान्य न करता अक्षदा टाव्हरे यांना मताधिक्य देत विजयी केले आहे.

Web Title: The Gram Panchayat which had been held by Dilip Walse Patil since its inception, escaped; Sarpanchpadi Rabindra Valse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.