‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरी २७ डिसेंबरपासून रंगणार

By श्रीकिशन काळे | Published: December 9, 2024 05:53 PM2024-12-09T17:53:58+5:302024-12-09T17:55:59+5:30

महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे.

The grand finale of Purushottam will be played from 27th December | ‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरी २७ डिसेंबरपासून रंगणार

‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरी २७ डिसेंबरपासून रंगणार

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी शुक्रवार, दि. २७ डिसेंबर ते रविवार, दि. २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. पुण्यासह अमरावती, रत्नागिरी, संभाजीनगर आणि कोल्हापूर विभागातील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्वोकृष्ट प्रायोगिक अशा प्रत्यकी चार एकांकिकांचे सादरीकरण होणार असून यातून महाअंतिम फेरीतील विजेता ठरणार आहे.

महाअंतिम फेरी भरत नाट्य मंदिर येथे पाच सत्रात होणार आहे. दि. २७ आणि दि. २८ रोजी सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ९ आणि दि. २९ रोजी सकाळी ९ ते १ या वेळात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण सभारंभ दि. २९ डिसेंबर२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजिला आहे. केवळ छत्रपती संभाजीनगरमधील विजेता अंतिम व्हायचा आहे.

महाअंतिम फेरीत पोहोचलेले संघ :

पुणे विभाग : म. ए. सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय (बस नं. १५३२), विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बारामती (पाटी), न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगर (देखावा), म. ए. सो.चे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर कोर्सेस (सखा).

अमरावती विभाग : श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला (तमसो मा ज्योतिर्गमय), श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (डेडलाईन), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (बट बिफोर लिव्ह), प्रादेशिक कला विभाग -१ (सं. गा. बा. अ. वि.), अमरावती (उत्खनन),

रत्नागिरी विभाग : आठल्य, सप्रे, पित्रे महाविद्यालय, देवरुख (हिरो नंबर १), सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड (समाप्त), फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी (होळयो नागरा), संत राऊळ महाराजा महाविद्यालय, कुडाळ (ऑफलाईन),

कोल्हापूर विभाग : शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर (कलम ३७५), राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूर (व्हाय नॉट?), डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पिंडग्रान), देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर (यात्रा)

तिकीट ऑनलाईनही :

महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीची तिकीटे ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. तसेच विद्यार्थी तसेच नाट्य रसिकांना तिकिट खिडकीद्वारे तिकीट घेता येईल. 

Web Title: The grand finale of Purushottam will be played from 27th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.