आराेग्य विभाग म्हणजे गाेंधळात गाेंधळ! अधिकाऱ्यांच्या बदल्या, अतिरिक्त पदभारांचा धडाका
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: September 2, 2023 05:46 PM2023-09-02T17:46:36+5:302023-09-02T17:48:57+5:30
आराेग्य सेवा माेफत केल्याने सरकारी रुग्णालयांतील रुग्णांची आकडेवारी २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे...
पुणे : राज्यात डाेळयांसह कीटकजन्य, जलजन्य साथीच्या आजारांचा प्रभाव सूरू आहे. परंतु, आराेग्य संचालक पद तीन आठवडयांपासून रिक्तच आहे. इतकेच नव्हे तर आराेग्य विभागातील अनेक वरिष्ठ अधिका-यांची बदली, अतिरिक्त पदभारदेखील बदलले आहेत. त्यामुळे, पुण्याच्या साथराेग विभाग, कुटूंब कल्याण, क्षयराेग, टीबी, आईईसी ब्युराे या खात्यात गाेंधळ निर्माण झाला आहे.
पुणे आणि मुंबई येथील दाेन्ही आराेग्य संचालकांची पदे रिक्त असून, याला १३ दिवस उलटले तरी अजूनही रिक्त पदे भरलेली नाहीत. त्यामुळे आराेग्य विभागातल्या विनंती बदल्या, नवीन भरती प्रक्रिया, लाखाेंची खरेदी आणि मंजुरी प्रकरणे रखडली आहेत. आराेग्यमंत्री खात्याचे पूर्ण स्ट्रक्चर बदलण्याची भाषा करतात; परंतु साधा संचालक नियुक्त का करत नाहीत? असा सवाल आता आराेग्य क्षेत्रातील जाणकार उपस्थित करत आहेत.
आराेग्य संचालक हा आराेग्य खात्याचे प्रमुख पद आहे. मुंबई आणि पुणे, असे दाेन आराेग्य संचालक पदे असून ते गेल्या तीन आठवडयांपासून रिक्तच आहेत. त्यामुळे, कर्मचारी, प्रशासकीय बदल्या, विनंती बदल्या, औषधे खरेदी, कारवाया, नवीन कामांना मंजुरी आदी प्रकरणे पुणे आणि मुंबई येथे रखडली आहेत. आराेग्य संचालकच नसल्याने राज्यात महत्त्वाच्या कामांचा खाेळंबा झाला आहे.
सेंट्रल बिल्डिंग येथे याआधी ज्यांच्याकडे सहसंचालकांचा पदभार हाेता त्यांना सहायक संचालकांचा पदभार दिला आहे. तर, कुटूंब कल्याण कार्यालयातील अधिका-याला राज्य आराेग्य व शिक्षण म्हणजेच आयईसी ब्युराे विभागाची धुरा दिली आहे. तर काही अधिका-यांना क्षयराेग व टीबी या कार्यक्रमाचे प्रमुख केले आहे. या बदल्या, पदभार काेणाच्या आशिर्वादाने हाेत आहेत हे कळायला मार्ग नाही. परंतू, हे बदल इतक्या झटपट झाले आहेत की त्यामुळे विविध आराेग्य कार्यक्रमांचा खाेळंबा झाला आहे.
आराेग्य सेवा माेफत केल्याने सरकारी रुग्णालयांतील रुग्णांची आकडेवारी २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. अशा परिस्थितीत जर आराेग्य संचालक पद रिक्त असतील तर पेशंटला लागणारे औषधे व इतर साहित्य खरेदी कसे करायचे असाही प्रश्न निर्माण झाला आहे.