Pune: हेल्मेटसक्ती नाही पण कारवाई सुरूच; पुणेकरांना CCTV द्वारे दररोज १५ लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 01:26 PM2022-04-01T13:26:20+5:302022-04-01T13:26:27+5:30
पुणे : शहरातील चौकाचौकांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीद्वारे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत आहे. नव्या वर्षातील ...
पुणे : शहरातील चौकाचौकांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीद्वारे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत आहे. नव्या वर्षातील पहिल्या ८८ दिवसांत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर २ लाख ८० हजार ९७ केसेस करण्यात आल्या आहेत. १४ कोटी ४८ हजार ५०० रुपये दंड करण्यात आला आहे. हे पाहता दररोज ३ हजार १८२ पुणेकर दुचाकीस्वारांवर केवळ हेल्मेट न घातल्याने कारवाई होत असून, त्यांच्यावर १५ लाख ५९ हजार रुपयांचा दंड केला जात आहे.
गेल्या वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात शहरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर एकूण १७ लाख ३९ हजार ९६४ केसेस करण्यात आल्या होत्या. त्याचा एकूण ८६ कोटी ९९ लाख ८२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. हे पाहता गेल्या वर्षी दररोज सरासरी ४ हजार ७६७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत होती. त्यांच्याकडून सरासरी २३ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा दंड आकाराला जात होता.शासकीय कार्यालयात आता हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याने हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.