कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग पुण्यातील मुळा-मुठा नदीतून?; पाण्याचं संकलन करून तपासणीसाठी पाठवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 06:51 PM2022-04-27T18:51:59+5:302022-04-27T18:55:01+5:30
मुळा-मुठा नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दुषित पाणी सोडल्यामुळे नागरिकांना कॅन्सरचा धोका निर्माण झाला आहे.
पुणे: कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीमुळे झाला असल्याचा खळबळजनक दावा छावा संघटनेनं केला आहे. आज वृद्धेश्र्वर मंदिर देवस्थान गणपती विसर्जन घाट इथं छावा संघटनेकडून मुठा नदीच्या पाण्याचं संकलन करून तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळाकडे पाठवण्यात येणार आहे.
मुळा-मुठा नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दुषित पाणी सोडल्यामुळे नागरिकांना कॅन्सरचा धोका निर्माण झाला आहे. या दूषित पाण्याचे पाण्याचे पृत्थकरण महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून केले असता यातील विविध रासायनिक घटकांचा विषाणूचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळले हे रोगजन्य विषाणू प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष स्वरूपात आपल्या शरीरात जात असल्याने कॅन्सर सारखे रोगांना आमंत्रण दिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाण्याची तपासणी केली असता या पाण्यापासुन कॅन्सर चा धोका आढळून आला या संधर्भातील निष्कर्ष देखील आरीफ शेख यांनी सर्वप्रथम जाहीर केले होते.
तसेच मुळा-मुठा नदीतील दुषित पाण्याचे तपासणीचे रिपोर्ट आल्यावर संबंधित पुणे महानगरपालिका, व महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका नगरपरिषद नगर पंचायत जे नदी दूषित करीत आहे या सर्वांवर तसेच पुणे मनपा आयुक्त, आधिकारी, मंत्री यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशारा देखील छावा स्वराज्य सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफभाई शेख यांनी आज दिला.
मुळा-मुठा नदीतील दुषित पाण्यामुळे पुणेकरांना कॅन्सर तसेच इतर असंख्य महारोगाचा धोका टाळण्यासाठी मुळा-मुठा नदीतील पाणी संकलन करून तपासणीसाठी उपसंचालक आरोग्य सेवा, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आज नेण्यात आले. छावा स्वराज्य सेना संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफभाई शेख यांनी केलेल्या नदी सुधार प्रकल्पांतर्गत ३ वर्षाच्या अभ्यासपूर्ण रिपोर्टनुसार ही प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी राम पाटील (छावा स्वराज्य सेना, संस्थापक /अध्यक्ष), आरिफ भाई शेख ( प्रदेश कार्याध्यक्ष), शीतल हुलावळे (प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी), सोनाज नेटके (पुणे उपाध्यक्ष, छावा स्वराज्य सेना), निर्मला रायरीकर, सुषमा यादव, चित्रा जानुगडे (कायदेशीर सल्लागार), धनश्री बोनाडे, सतीश कांबळे, सर्व पदाधिकारी व कायदेशीर सल्लागार मंडळ उपस्थित होते.