पत्नीच्या आरोपातून पतीची सव्वासहा वर्षांनी मुक्तता, सत्र न्यायाधीशांनी दिला निर्णय
By नम्रता फडणीस | Published: January 22, 2024 06:49 PM2024-01-22T18:49:54+5:302024-01-22T18:53:24+5:30
पत्नी, मुलगी, सोसायटीचे चेअरमन व चौकशी अधिकारी यांची साक्षीदार म्हणून तपासणी केली....
पुणे : वडिलांनी नऊ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप पत्नीने केला होता. त्या आरोपातून पतीची सत्र न्यायाधीश एस.एस. गुल्हा यांनी सव्वासहा वर्षांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
नोव्हेंबर, २०१७ मध्ये याबाबत वाकड पोलिसात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८, १२, विनयभंग आणि धमकावण्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. बचाव पक्षातर्फे ॲड.प्रमोद पाटील, ॲड.विश्वास पाटील, ॲड.सौरभ पाटील यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.अमोदकुमार, ॲड.पंकज पुरोहित यांनी साहाय्य केले.
पत्नी, मुलगी, सोसायटीचे चेअरमन व चौकशी अधिकारी यांची साक्षीदार म्हणून तपासणी केली. गुन्हा घडला, त्यावेळी आरोपी सोसायटीत नव्हता. पत्नीचे लग्नापासून मित्रासोबत प्रेमसंबंध आहेत. पती याला अडसर ठरत आहे. या रागातून तिने खोटी फिर्याद दिली आहे, तसेच पत्नीने फसवून जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली आहे. त्यामुळे पतीची निर्दोष मुक्तता करावी, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲड.प्रमोद पाटील यांनी केला.