बंडखोरांना शिवसैनिकांसह जनतेचा तळतळाट लागेल; मावळात एकनिष्ठ शिवसैनिकांची एकजूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 04:21 PM2022-07-27T16:21:21+5:302022-07-27T16:21:32+5:30

उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या घटनेने शिवसैनिकांसह राज्यातील जनतेला दुःख झाले

The insurgents will have to subvert the people including the Shiv Sena workers Unity of loyal Shiv Sainiks in Maval | बंडखोरांना शिवसैनिकांसह जनतेचा तळतळाट लागेल; मावळात एकनिष्ठ शिवसैनिकांची एकजूट

बंडखोरांना शिवसैनिकांसह जनतेचा तळतळाट लागेल; मावळात एकनिष्ठ शिवसैनिकांची एकजूट

Next

वडगाव मावळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या घटनेने शिवसैनिकांसह राज्यातील जनतेला दुःख झाले आहे. त्यामुळे या बंडखोर आमदार आणि खासदारांना शिवसैनिकांसह सर्वसामान्य जनतेचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. निष्ठावंत शिवसैनिकांच्या जिवावर निवडून आलेले आमदार, खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत. त्यांनी पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असे आवाहन शिवसेना महिला आघाडी मावळ तालुका संपर्क संघटिका लतिका पाष्टे यांनी केले. बैठक बोलावली असतानाही मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती लावल्याने या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

मावळ तालुका निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक वडगाव मावळ येथील द्वारकाधीश मंगल कार्यालयात सोमवारी (दि. २५ ) घेण्यात आली. त्यावेळी लतिका पाष्टे यांनी शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदार, खासदारांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या बैठकीला शिवसेनेचे भारत ठाकूर, शांताराम भोते, अनिकेत घुले, शादान चौधरी, रमेश जाधव, अनिल ओव्हाळ, मदन शेडगे, अमित कुंभार, राहुल नखाते, राम सावंत, विकेश मुथा, शैला खंडागळे, भरत नायडू, विशाल दांगट, देवा कांबळे, मेहरबान सिंग आदींसह मावळातील अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार, खासदार शिवसेना सोडून गेले. अशा फुटारांच्या जिवावर शिवसेना कधीच नव्हती आणि यापुढेही राहणार नाही. उलट आता नव्या जोमाच्या शिवसैनिकांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. पक्ष वाढ आणि जनतेची कामे करून आम्ही पुन्हा आमदार, खासदार निवडून आणून दाखवू. -अनिकेत घुले, जिल्हाधिकारी, युवा सेना

Web Title: The insurgents will have to subvert the people including the Shiv Sena workers Unity of loyal Shiv Sainiks in Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.