गुलालाची उधळण, ढोल ताशा लेझीमचा गजर; मानाचा तिसरा पुण्याचा राजा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:27 PM2024-09-17T12:27:49+5:302024-09-17T12:29:31+5:30
नादब्रह्म ढोल ताशा पथकाने आकर्षक वादन करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
पुणे: दरवर्षीप्रमाणे नुसतीच गुलालाची उधळण, गुलाबी झालेले सगळे कार्यकर्ते, ढोल ताशांचा जोरदार गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याचा राजा मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाने आकर्षक वादन करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
फुलांच्या सजावटीत सुर्यरथात विराजमान बाप्पा मिरवणुकीचे आकर्षण ठरले. तृतीयपंथियांचे शिखंडी पथकाने मिरवणुकीत उत्तम वादन केले
स्वप्निल सरपाले व सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या फुलांच्या आकर्षक 'सूर्य' रथातून श्रींची वैभव शाली विसर्जन मिरवणूक सुरू झाली. मिरवणूक सकाळी १०:३० वाजता लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते आरती होऊन गुरुजी तालीम मंडळ लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ झाला.