वेटरने बिल मागितलं म्हणून केले त्याचे अपहरण; मुंबई-बंगळुरू महामार्गावरील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 02:29 PM2022-07-14T14:29:00+5:302022-07-14T14:29:18+5:30

भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली

The kidnapper did as the waiter asked for the bill Shocking incident on Mumbai Bangalore highway | वेटरने बिल मागितलं म्हणून केले त्याचे अपहरण; मुंबई-बंगळुरू महामार्गावरील धक्कादायक घटना

वेटरने बिल मागितलं म्हणून केले त्याचे अपहरण; मुंबई-बंगळुरू महामार्गावरील धक्कादायक घटना

Next

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर हॉटेलमध्ये जेवल्यानंतर वेटरने बिल मागितलं, म्हणून त्याला बेदम मारहाण करून त्याचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली आहे.  याप्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

योगेश सर्जेरावर पारधे (वय २८ अहमदनगर), रवींद्र सखाहरी कानडे (वय ४१), रुपेश अशोक वाडेकर (वय ३८), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय ३२), नितीन अशोक वाडेकर (वय ३२ रासदर जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शारदा निलेश भिलारे (वय ३८ भिलारेवाडी कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपहरण करणारे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर याआधी ३०२, ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यांना जेजुरी जवळील दोरगेवाडी डोंगरातून पाठलाग करून पकडले.
  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलारे यांचे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ रानमाळ हॉटेल आहे. आरोपी पारधे, कानडे, वाडेकर, बेंद्रे हॉटेलमध्ये  जेवण करण्यासाठी आले होते. आरोपींनी जेवण केल्यानंतर हॉटेलमधील कामगार किशोर कोईराला याने त्यांच्याकडे बिल मागितले. त्यानंतर आरोपींनी कोईराला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी भिलारे यांना धमकावले. उद्या तुम्ही या मरणाची खबर ऐकाल, अशी धमकी आरोपींनी दिली. कोईरालाला धमकावून आरोपींनी मोटारीत बसवले. त्यानंतर आरोपी त्याला घेऊन पसार झाले. काही अंतरावर त्याला सोडून त्याला आरोपी पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर भिलारे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, पोलिस कर्मचारी विक्रम सावंत व निलेश खैरमोडे यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, अपहरण करणारे आरोपी जेजुरी जवळील दोरगेवाडी येथील डोंगरात आरोपी लपून बसले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, उपनिरीक्षक नितीन शिंदे, धिरज गुप्ता कर्मचारी रविंद्र चिप्पा, गणेश गुप्ता, तुळशीराम टेंभुर्णे, सचिन गाडे यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: The kidnapper did as the waiter asked for the bill Shocking incident on Mumbai Bangalore highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.