फळांचा राजा सामान्यांच्या आवाक्यात; आंब्याच्या दरात घसरण, चव चाखायला तयार व्हा...!

By अजित घस्ते | Published: April 28, 2024 06:44 PM2024-04-28T18:44:17+5:302024-04-28T18:45:00+5:30

हापूसचे दर डझनामागे ३०० ते ५०० रुपयांनी, तर पायरीचे दर डझनामागे २०० ते ३०० रुपयांनी उतरले आहेत

The king of fruits within the reach of the common man Mango price drop get ready to taste...! | फळांचा राजा सामान्यांच्या आवाक्यात; आंब्याच्या दरात घसरण, चव चाखायला तयार व्हा...!

फळांचा राजा सामान्यांच्या आवाक्यात; आंब्याच्या दरात घसरण, चव चाखायला तयार व्हा...!

पुणे: गुढी पाडवा झाल्यानंतर कोकणातल्या आंब्याची मोठ्या प्रमाणात मार्केटयार्डात आंब्याची आवक होत होती. सध्या मागील आठड्याच्यातुलनेत या रविवारी फळ बाजारात आंब्यांची आवक कमी प्रमाणात झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान मागच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचे डझनामागे ३०० ते ५०० रुपयांनी उतरले आहेत. मागच्या आठदिवसांत झालेले ढगाळ वातावरण, तसेच आंब्याची वाढती आवक त्यामुळे हापूस आंब्याचे दर उतरले असल्याने सामान्यांना ही सध्या आंबा खाता येत आहे. ५ डझनाच्या पेटीचा भाव २ ते २ हजार ५०० रुपयांच्या वरून भाव १२०० ते २२०० रुपये पेटीपर्यंत खाली आला. त्यामुळे हापूस आंबा खाणाऱ्यांना चांगलीच संधी आली आहे. मात्र अक्षयतृतीय निमित्ताने भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.--

असे आहेत आंब्याचे भाव

प्रकार                                            सध्या            

हापूस आंबा (४ ते ६ डझन)          १५०० ते १८००              
पायरी (एक डझन)                        ५०० ते ६००                  
बदाम आंबा ५० ते ६० प्रति किलो       ७० ते ८०
लालबाग २५ ते ३० रुपये किलो          ४० ते ५०
केशर ७० ते ८० प्रति किलो               ८० ते १००
कोट :

आठ दिवसांत झालेले ढगाळ वातावरण, तसेच आंब्याची वाढती आवक त्यामुळे हापूस आंब्याचे दर उतरले आहेत. रविवारी मात्र जिल्ह्यात निवडणूक वातावरणामुळे आंब्याच्या मागणीला जोरदार फटका बसला असून भाव कमी झाले आहेत. - रोहन उरसळ आंबा व्यापारी मार्केटयार्ड

कडक उन्हाळा आणि बदलते वातावरण यामुळे आंब्यावर परिणाम होत असतो. यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत आंबे स्वस्त झाल्याने सामान्यांना ही यंदा हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे. त्यात मागील आठवड्याच्या तुलनेत भाव कमी झाले आहेत. १२०० ते ३ हजार पर्यत ४ ते ७ डझन आंबे भाव आहेत.- युवराज काची, आंबा होलसेल व्यापारी
 

Web Title: The king of fruits within the reach of the common man Mango price drop get ready to taste...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.